घरमनोरंजनHardik Pandya:हार्दिक पांड्या आणि नताशा पुन्हा देणार गुडन्यूज ?

Hardik Pandya:हार्दिक पांड्या आणि नताशा पुन्हा देणार गुडन्यूज ?

Subscribe

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या खेळासह व्यक्तीगत जीवनातील घडामोडी नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सध्या हार्दीक त्याच्या पत्नी नताशासह( natasa stankovic) ख्रिसमस सेलिब्रेशन तसेच नववर्षाचे स्वागत करण्यात व्यस्त आहे. या सेलिब्रेशन दरम्यानचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हार्दिकने नताशा आणि मुलगा अगस्त्यसह एक सुंदर फॅमिली फोटो शेअर केला असून हा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.(Is hardik pandya wife natasa stankovic preganant)

फोटोमध्ये हार्दिकने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे तर नताशाने पिंक कलरचा वेस्टर्न आऊटफीट वेअर केलाय. मात्र या फोटोवरून चाहत्यांनी नताशा पुन्हा एकदा आई होणार असल्याचा अंदाज लावला आहे. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी याबाबत विचारणा देखील केली आहे. मात्र दोघांनी या बातमीवर मौन बाळगणे पसंत केलं आहे.

- Advertisement -

नताशा आणि हार्दिकच्या लव्हस्टोरी बाबत सांगायचे झाल्यास हार्दिकने 1 जानेवारी 2020 साली सोशल मीडियावर क्रूझवरचा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत दोघांनी एंगेजमेंट केली असल्याची माहिती दिली होती. तसेच यापूर्वी त्यांची भेट अनेक पार्टी दरम्यान झाली होती आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. लग्नाच्या अगदी काही महीन्यातच नताशा प्रेग्नेंट असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं होतं. यामुळे काहींच्या भूवया उंचावल्या तर चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. आता व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे नताशा पुन्हा गरोदर असल्याचे दिसत आहे. मात्र अद्याप याबाबत त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला नाहीये.

- Advertisement -

हे हि वाचा-  बोल्ड नाही तर साध्या लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री आहे फॅन्सची लाडकी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -