Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन जान्हवी कपूर करतेय महाराष्ट्राच्या माझी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट; अंबानींच्या पार्टीत दोघंही एकत्र

जान्हवी कपूर करतेय महाराष्ट्राच्या माझी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट; अंबानींच्या पार्टीत दोघंही एकत्र

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटांसोबतच जान्हवी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवीला मागील काही दिवसांपासून अनेकदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पाहाडियासोबत बऱ्याच ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान आता अशातच त्यांचा आणखीएक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे जान्हवी आणि शिखर पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र आले. तेव्हापासून ते दोघेही सतत एकत्र दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

सध्या जान्हवी आणि शिखरचा व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ अंबानींच्या कार्यक्रमातील आहे. 29 डिसेंबरला मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये जान्हवी आणि शिखर देखील उपस्थित राहिला होता. त्यावेळीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इतकंच नव्हे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांचा वाढदिवस झाला त्या पार्टीमध्ये देखील शिखर उपस्थित होता. यावेळचा शिखर आणि बोनी कपूर यांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- Advertisement -

कोण आहे शिखर पाहाडिया?
शिखर पाहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहाडिया यांचा तो मुलगा आहे. याआधी देखील जान्हवी आणि शिखरला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. 2016 मध्ये जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले. त्यांच्या नात्याबाबत ‘कॉफी विथ करण 7’मध्ये देखील जान्हवीने खुलासा केला होता. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपासून दोघांनी पुन्हा आपल्या नात्याचा सुरुवात केली असल्याचं म्हटलं जात आहे.

 


हेही वाचा :

प्रभासच्या गर्लफ्रेंडबाबत राम चरणने केला खुलासा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -