घरमनोरंजनYeh Rishta Kya Kehlata Hai:मालिकेला अभिनेता मोहसिन खानने ठोकला रामराम?

Yeh Rishta Kya Kehlata Hai:मालिकेला अभिनेता मोहसिन खानने ठोकला रामराम?

Subscribe

मोहसिन आता ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच चित्रपटात काम करु इच्छित असल्याचे त्याने सांगितले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (yeh rishta kya kehlata hai)गेल्या अनेक दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेता मोहसिन खान ( mohsin khan) आणि शिवांगी जोशी (Shivangi Joshi)या दोघांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. सोशल मीडियावर त्यांची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग असून अनेक फॅन पेजेस चाहत्यांनी तयार केले आहेत. याचदरम्यान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सेटवरुन एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मालिकेत काम करणारा प्रमुख अभिनेता मोहसिन खान लकरच मालिकेतून एक्झिट होणार असल्याची बातमी समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मोहसिन खानने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शोमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात येत असून मोठा जनरेशन गॅप दाखवण्यात येणार असल्याने मोहसिन जास्त वय असणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारू इच्छित नसल्याने त्याने टेलिव्हिजनमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोहसिन आता ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच चित्रपटात काम करु इच्छित असल्याचे त्याने सांगितले आहे. (is mohsin khan going to leave the show yeh rishta kya kehlata hai)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohsin Khan (@khan_mohsinkhan)

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षापासून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अनेक मुख्य कलाकारांनी त्यांच्या व्यक्तीगत कारणांमुळे शोला राम राम केल्यानंतरही शोच्या टिआरपीमध्ये कधीच फरक झाला नाही. प्रेक्षकांनी प्रत्येक कलाकाराचे स्वगत करत त्यांच्यावर भरभरुन प्रेम केलं. आता शो मधील मुख्य कलाकार पुन्हा एकदा शो मधून जात असल्याने चाहते कशा प्रकारे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या पुढील एपिसोडला प्रतिसाद देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – BiggBoss15:लवकरच टेलिव्हिजनवर दाखल होतोय बिग बॉस 15

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -