घरमनोरंजन'देसी गर्लला' निक जोन्स देणार बर्थडे सरप्राईज?

‘देसी गर्लला’ निक जोन्स देणार बर्थडे सरप्राईज?

Subscribe

प्रियांका चोप्राचा कथित बॉयफ्रेंड निक जोन्स, तिच्या ३६ व्या बर्थडेसाठी काहीतरी खास प्लॅनिंग करत असल्याचं समजत आहे. दरम्यान निक प्रियांकाला काहीतरी सरप्राईज देणार असून, त्याविषयी विविध चर्चा रंगत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोन्स यांच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. हे कथित कपल आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. देसी गर्ल प्रियांका लवकरच तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने प्रियांकाच कथित बॉयफ्रेंड निक जोन्स काहतरी भन्नाट प्लॅनिंग करत असल्याचं समजत आहे. यासाठी निकने जय्यत तयारी सुरु देखील केली असल्याचं कळतंय. येत्या १८ जुलैला प्रियांका निकसोबत आपला वाढदिवस साजरा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता निक जोन्स प्रियांकाला काय स्पेशल सरप्राईज देणार याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. उपलब्ध माहितीनुसार निक प्रियांकाला देणार असलेल्या बर्थडे सरप्राईजमध्ये तिचं आवडतं ‘बीच डेस्टिनेशन’ सुद्धा असू शकतं.

रोमँटिक डेटची चाहूल

दुसरीकडे निक जोन्स आणि प्रियांका तिच्या वाढदिवशी खास रोमँटिक डेटवर जाणार असल्याचे समजत आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, प्रियांका आणि निक यांनी डेटसाठी ‘ग्रीस’ची निवड केली आहे. ग्रीस ही प्रियांकाची अत्यंत आवडती जागा असल्यामुळे निक तिला ग्रीसमध्ये रोमँटिक डेटसाठी घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. वृत्तानुसार, निक प्रियांकाला ग्रीसमधील तिच्या आवडत्या स्पॉटवर घेऊन जाणार असून, त्याठिकाणचं सगळं बुकिंग त्याने आधीच करुन ठेवलं आहे. मात्र, यासंबधीच्या अजून सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या अाहेत. आता निक ‘बर्थडे गर्ल’ला नेमकं काय सरप्राईझ देणार हे १८ जुलैलाच समजेल.

- Advertisement -

नेमकं नातं काय

प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच तिचा कथित बॉयफ्रेंडला घेऊन भारतात आली होती. तिने निकची आणि तिच्या आईची भेटही घडवून आणली. बऱ्याच काळापासून प्रियांका आणि निकच्या अफेअरची चांगलीच चर्चा आहे. मध्यंतरी अनेक इव्हेंट्समध्ये त्यांचं एकत्र दिसणं किंवा मग आउटिंगसाठी एकत्र बाहेर जाणं, अशा बऱ्याच कारणांमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आआलं होतं. दरम्यान प्रियांका आणि निक भारतामध्ये काही काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र भारत भेटीनंतर काही दिवसातच हे कपल पुन्हा अमेरिकेला रवाना झालं. त्यात भर म्हणून सध्या त्यांच्या ‘बर्थडे डेट’च्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे एकंदरितच या दोघांमधील नात्याला नेमकं काय नाव द्यायचं? असा प्रश्न तमाम लोकांना पडला असणार.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -