भाईजान सलमान खान हॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, करणार का लग्न?

सलमान या हॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात असून तो तिला डेट करत असल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र, आता अभिनेत्रीने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

is salman khan dating hollywood actress samantha lockwood
भाईजान सलमान हॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, करणार का लग्न?

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर अभिनेता सलमान खान याच्या लग्नाबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. यात सलमान खान त्याच्या लव्ह लाईफमुळे कायम चर्चेत असतो. प्रत्येक वेळी भाईजान सलमानचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडले जाते. परंतु प्रत्येक वेळी तो स्वत:ला सिंगल असल्याचेच सांगतो. यातच सलमानच्या 56 व्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत सलमानच्या बाजूला उभ्या असलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या हॉलिवूड अभिनेत्री नाव समंथा लॉकवूड असे आहे. सलमान या हॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात असून तो तिला डेट करत असल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र, आता अभिनेत्रीने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि समांथा लॉकवूडच्या लिंकअपच्या बातम्या गाजत आहेत. अलीकडेच समांथा लॉकवूड सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर हजर होती. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. हॉलिवूड अभिनेत्री समांथा लॉकवूड सध्या भारतातच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaina Chudasama Munot (@shaina_nc)

समंथा लॉकवुड म्हणाली, ‘मला वाटते लोक याबद्दल जरा जास्तच बोलत आहे. पण यावर बोलण्यासारखे काहीच नाही. मी सलमानला भेटले आणि तो खूप चांगला माणूस आहे. एवढेच त्याच्याविषयी सांगण्यासारखे आहे. पण लोकांची ही विचारसरणी कुठून येते हे मला कळत नाही. म्हणजे मी सलमानला भेटण्याआधी हृतिक रोशनला भेटले होते, पण माझ्या आणि हृतिकबद्दल कोणी काही बोलत नाही. त्यामुळे ही बातमी कुठून आली हे मला माहीत नाही असं ती म्हणाली.

सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल सामंथा लॉकवूड म्हणाली, मी फक्त सलमानला ओळखत होते. याआधी मी त्याला दोन वेळा भेटली आहे, त्यामुळे माझ्यासाठी तो एकमेव सेलिब्रिटी होता. सलमान खानने गेल्या महिन्यात त्याच्या पनवेल फार्महाऊसवर त्याच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबासोबत सेलिब्रेशन केले होते.

सलमान खान सध्या बिग बॉस 15 हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. त्याचवेळी हा अभिनेता टायगर 3 सिनेमामुळे विशेष चर्चेत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ देखील झळकणार आहे. याशिवाय त्याच्याकडे कभी ईद कभी दिवाळी आणि नो एंट्री का सिक्वेल सारखे चित्रपट आहेत.


Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय? ‘या’ दिवशीच भीष्म पितामहांनी केला देहत्याग