शाहिद कपूरला कॅन्सर? अफवा की…

अभिनेता शाहिद कपूरला कर्करोगाची लागण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. मात्र शाहिदची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगत कपूर कुटुंबाने त्याला कॅन्सर झाल्याच्या अफवा धुडकावून लावल्या आहेत.

shahid kapoor
शाहिद कपूर (सौजन्य-डेक्कन क्रोनियल)

अभिनेता शाहिद कपूरला कर्करोगाची लागण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. एका वेबसाइटने शाहिदचं नाव न घेता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचं वृत्त दिलं होतं. तेव्हापासूनच शाहिदच्या नावाची चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे तर उपचारासाठी शाहिद मुंबईबाहेर गेल्याचीही अफवा होती. परंतु, या सर्व चर्चा खोट्या असून शाहिदची प्रकृती ठीक असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. शाहिदची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगत कपूर कुटुंबाने त्याला कॅन्सर झाल्याच्या अफवा धुडकावून लावल्या आहेत.

कुठुन येतात या बातम्या 

शाहिदला कर्करोग झाल्याच्या चर्चा अफवा असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ‘शाहिदला कर्करोग झाल्याची बातमी आली तरी कुठून? अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात कोणाला काय आनंद मिळतो,’ असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे शाहिद काही कामानिमित्त दिल्लीला गेला असून दोन-तीन दिवसांत मुंबईला परतणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कलाकार पुत्र शाहिद 

शाहिद कपूर हा ३७ वर्षीय अभिनेता असून त्याने २०१५ साली मीरा राजपूत हिच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी मिशा तर दोन महिन्यांचा मुलगा झैन आहेत. अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीज यांचा तो मुलगा आहे. मात्र त्यांच्य घटस्फोटानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर तर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केले. २००३ साली शाहिदने इश्क विश्क चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.