घरमनोरंजनशाहरुखही सुपरहिरो पण हॉलिवूडमध्ये

शाहरुखही सुपरहिरो पण हॉलिवूडमध्ये

Subscribe

मनोरंजनासंबंधी बातम्या वाचा एका क्लीकवर...

शाहरुख खान हॉलिवूडच्या एका चित्रपटांत सुपरहिरोचा रोल साकारण्याच्या बातम्या आहेत. हॉलिवूडच्या मार्वल फिल्म्स कंपनीने किंग खानला आपल्या पुढील चित्रपटांतील हा रोल ऑफर केला आहे. याआधी किंग खानने रा-वन मध्ये सुपर हिरोचा रोल केला होता. एवेन्जर्स इन्फीनीटी वॉर रिलिज झाल्यानंतर मार्वल फिल्मचा दबदबा भारतात वाढला आहे. मार्वलचे क्रिएटीव्ह टीमचे स्टीफन वॉकर शाहरुखला नव्या चित्रपटांत घेण्याच्या विचारात आहेत. भारतीय प्रेक्षकांना विचारात घेऊन सुपरहिरोपट बनवला तर त्यात शाहरुखला असेल त्यांनी स्पष्ट केले आहे. शहारुखचे अमेरिका तसेच देशविदेशातही फॅन्स आहेत. त्यामुळे हॉलिवूडपटात तो असेल तर त्याचा फायदा भारतात आणि इतर देशातही होईल, असं स्टीफन यांचा अंदाज आहे.


‘डायन’ नंतर मोनलिसा झाली कोरियोग्राफर

मुंबई । डायन चित्रपटांतून शीर्षक भूमिका केलेली अभिनेत्री मोनालिसाने आपली नवी इनिंग सुरू केली आहे. ती आता कोरिओग्राफर म्हणून समोर येत आहे. नजर च्या नव्या पर्वात तीने काही गाण्यांना कोरिओग्राफ केलं आहे. तिने हर्ष राजपूत आणि सोनिया यांना डांस शिकवला. त्यावेळी खूप धमालमज्जा केल्याचं तिने सांगितलं. मी मुळातच एक डांसर आहे. अभिनय हा माझा आवडता छंद आहे. भोजपुरी चित्रपटांतून हिंदीच्या छोट्या पडद्यावर दाखल झालेली मोनालिसा लवकरच आपल्या नव्या रुपात येणार आहे.

- Advertisement -

लग्न…काहीतरीच काय?

मुंबई ।आपल्या अभिनयामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू मनमर्जियामुळे लाईमलाईटमध्ये आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित मनमर्जियातील तिच्या अभिनयाचे कौतूक होत आहे. अलिकडे प्रियंका चोप्रा आणि दिपिका पादुकोनच्या लग्नाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाल्यानंतर आता तापसीच्या लग्नाचीही अफवा पसरली आहे. मात्र तापसीने अशा अफवा फैलावणार्‍यांना फैलावर घेतलं आहे. माझ्या लग्नाची इतकी काळजी करण्याची गरज नाही. मी त्याच वेळी लग्न करेन ज्यावेळी मला आई होण्याची इच्छा होईल. असं तिने स्पष्ट केलं आहे. सध्या तरी मी माझ्या पुढील चित्रपटांच्या प्रोजेक्टवर लक्ष देणार असल्याचं तिने स्पष्ट केलं.


हनी सिंगच्या रंगतारीची धूम

मुंबई । यो यो हनी सिंगच्या रंगतारीनं सोशल मिडियावर धुडगूस घातला आहे. सलमान खान प्रोडक्शनच्या आगामी लवरात्री सिनेमात हनीचं हे गाणं आहे. या चित्रपटाच्या नावावरून त्याला विरोध होत आहे. हॉलिवूडमधील गायक कलाकार कानिया वेस्ट आणि मारून यांच्या गाण्यांनाही रंगतारीनं मागं टाकलं आहे. २४ तासांत सर्वाधिक पाहिलं गेलेलं हे गाणं असल्याचं म्हटलं जात आहे. या गाण्याच्या यशाबद्दल सलमान स्वतः खूष आहे. तर हनी सिंगची क्रेझ अजूनही असल्याचे स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

स्त्री १०० कोटींच्या घरात

stree movieमुंबई । १५ दिवसांपूर्वी रिलिज झालेला अमर कौशिकचा स्त्री सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर कायम आहे. नुकतेच या चित्रपटानं १०० कोटींचा गल्ला जमवल्याची माहिती आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर असलेल्या स्त्रीनं यमला, पगला, दिवानाला धोबीपछाड देऊन आपल्या भुतावळीनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सस्पेन्स, हॉररपट असलेल्या स्त्रीचं समीक्षकांनीही कौतूक केलं आहे. शुक्रवारी रिलिज झाल्यावर दुसर्‍याच दिवशी शनिवारी तीन कोटी ३ कोटींच्या घरात स्त्री गेली होती. त्यानंतर त्यात वाढच होत आहे. पहिल्या आठवड्यातच ६० कोटी नफा मिळवला तर त्यानंतरच्या आठवड्यात ३५ कोटींचा गल्ला तिकिटबारीवर मिळवून स्त्री १०० कोटींच्या घरात गेली आहे. माऊथ पब्लिसिटीचा फायदा या चित्रपटाला झाला असून वेगळे कथानक आणि उत्तम दिग्दर्शनामुळे स्त्री नं यश मिळवलं आहे.


गांजा विधानावरून उदयला पोलिसांनी झापलं

मुंबई । गांजा बाळगणं, विक्री आणि त्याचं सेवन करणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. असं अभिनेता उदय चोप्राला मुंबई पोलिसांनी सुनावलं आहे. ट्विटवरून उदय चोप्रानं गांजा व्यसनाचे समर्थन करणारी पोस्ट टाकली होती. गांजाला कायदेशीर मान्यता देण्याविषयी त्यानं सुनावलं होतं. पोलिसांनी त्याच्या या ट्विटला उत्तर देताना गांजा अजूनही अंमलीपदार्थ म्हणूनच ओळखला जात असून त्याचं सेवन किंवा विक्री करणं कायद्यानं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. त्यावर उदयनं मी गांजाचं सेवन करत नाही. मात्र केवळ माझं मत व्यक्त केलं होतं. अशी सारवासारव सुरू केली आहे. पोलिसांनी त्याला उत्तर देताना म्हटलं की, तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल अशा विधाने करताना विचार करावा, असा सल्लाही पोलिसांनी उदयला दिला आहे.


चांगल्या कामासाठी परिश्रम आवश्यक-मनोज

मुंबई ।आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने ओळखले जाणारे अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या नुकत्याच रिलिज झालेल्या गली गुलियांचं कौतूक होतंय. आपल्या चांगल्या कामासाठी प्रेक्षकांनी आपल्याला ओळखावं, त्यासाठी वेगवेगळ्या भूमिका करायला हव्यात. साच्यात अडकून पडणं धोक्याचं असतं. असंही मनोजनं सांगितलं आहे. मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात. ज्यात अभिनयाचा कस लागतो. त्यामुळे मी नेहमीच्या अशा भूमिकांच्या शोधात असतो. असंही मनोजनं म्हटलं आहे. सत्या चित्रपट ज्यावेळी आला त्यावेळी माझ्यामध्ये कमालीचा राग होता. त्याचा वापर रामूनं या चित्रपटासाठी केला. हे दिग्दर्शकाचं कौशल्य असतं. असंही मनोज म्हणाला. मनोजच्या गली गुलियां चित्रपटाचं कौतूक होत असतानाच या चित्रपटाला २३ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलं आहे. शिवाय चित्रपटाने अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. जॉन अब्राहमच्या नुकत्याच आलेल्या सत्यमेव जयतेमध्येही मनोजने महत्वाची भूमिका केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -