Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ही आत्महत्या आहे की लव्ह जिहाद?... तुनिषाच्या काकांनी विचारला प्रश्न

ही आत्महत्या आहे की लव्ह जिहाद?… तुनिषाच्या काकांनी विचारला प्रश्न

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. आता याचं दरम्यान, एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले तुनिषाचे काका?
तुनिषाचे काका पवन शर्मा म्हणाले की, “मला वाटतं की , हे 100% लव जिहाद प्रकरण आहे. परंतु मला वाटतं की, पोलिसांनी याचा तपास करावा, आम्हाला वाटतं की, हा तपास सर्व बाजूने व्हायला हवा. आम्हाला नाही माहिती ही नक्की आत्महत्या आहे की आणखी काही? आमच्या समोर कोणता रेकॉर्ड केलेला व्हिडीओ नाही आला.”

- Advertisement -

त्यांनी तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याचं म्हटल्यावर पोलिसांवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, पोलिस प्रशासन योग्य पडताळणी केल्याशिवाय ही आत्महत्या आहे हे कसं म्हणू शकतात? आधी संपूर्ण तपास करा. तेव्हा कळेल की ही आत्महत्या आहे की लव जिहाद”

शीजानसोबतच्या ब्रेकअपमुळे तुनिषाने केली आत्महत्या
‘दास्तान-ए-काबुल ‘या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माचा मालिकेतील सहकलाकार शीजान खानने तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. खरंतर, शीजान आणि तुनिषा एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. शीजानने तिला धोका दिला असल्याचे म्हटलं जात आहे. ज्यामुळे ती सतत चिंतेत असायची. या प्रकरणात पोलिसांनी शीजानवर तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर हे आरोप केले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

 

तुनिषाचा मृतदेह पाहून तिची आई जागीच कोसळली; व्हिडीओ व्हायरल

 

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -