घरमनोरंजनईशा देओल करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक,‘रुद्र' सिनेमात करणार अजय देवगणसोबत काम

ईशा देओल करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक,‘रुद्र’ सिनेमात करणार अजय देवगणसोबत काम

Subscribe

ईशा आता ओटीटी प्लॅटफॉमच्या माध्यमातून धमाकेदार एंन्ट्री करणार

बॉलिवूड अभिनेत्रींचे लग्न झाल्यावर किंवा त्यांना एखादे मुल झाल्यानंतर रुपेरी पडद्यापासून दूर गेल्याचे दिसते. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे ईशा देओल(isha deol). बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिने 2002 साली ‘कोई मेरे दिलसे पुछे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ईशाने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. तसेच ईशाने ‘धूम’ (Dhoom) सारख्या सुपरहिट चित्रपटात महत्वपुर्ण भूमिका साकारली होती. पण विवाहानंतर ईशा कोणत्याही सिनेमात झळकली नाही.  ईशा आता ओटीटी प्लॅटफॉमच्या माध्यमातून धमाकेदार एंन्ट्री करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra : The Edge Of Darkness) या सीरिजमध्ये ती दिसणार आहे. जवळपास एका दशकानंतर अभिनेत्री ईशा देओल आणि अजय देवगण (Ajay Devgn) एकत्र झळकणार आहेत. ईशा देओल 2015 साली एका साऊथ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर एका शॉर्ट फिल्म मध्ये. ईशा पुन्हा एकदा सिनेमात काम करण्यासाठी सज्ज होत असल्याने ईशाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. (Isha Deol will make a comeback in Bollywood, work with Ajay Devgn in ‘Rudra’)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Deol Takhtani (@imeshadeol)

- Advertisement -

ईशाच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास तिने 2012 साली भारत तख्तानी याच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही.तसेच ईशाला 2 मुलंही आहेत. आता ईशा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपला जलवा दाखवण्यास सज्ज होत असल्याचे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -


हे हि वाचा – KGF 2:अभिनेत्री रवीना टंडनने पोस्ट शेअर करत लिहलं, मॉन्स्टर तेव्हाच येईल जेव्हा..



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -