घरताज्या घडामोडीAryan Khan Case: अनन्याच्या भेटीला इशान खट्टर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aryan Khan Case: अनन्याच्या भेटीला इशान खट्टर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने अनन्याला तीन वेळा चौकशीसाठी बोलावले. अनन्या फक्त दोन वेळा एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहिली, तिसऱ्या दिवशी अनन्या वैयक्तिक कारणास्तव एनसीबीच्या चौकशीसाठी गैरहजर राहिली. या कठीण काळात अनन्याला तिचा जवळचा मित्र शाहिद कपूरचा भाऊ, अभिनेता इशान खट्टर साथ देत आहे. सतत अनन्याच्या संपर्कात इशान असल्याचे बोलले जात आहे.

अनन्याच्या चौकशी दरम्यान इशान खट्टर अनन्याच्या बिल्डिंग बाहेर फुलं घेतला स्पॉट झाला होता. त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुरू आहे. इशान फुलांचे गुच्छ घेऊन अनन्याला भेटायला गेला होता, असे म्हटले जात आहे. पण यामुळे इशान ट्रोलर्सचा शिकार झाला आहे. हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी म्हणत आहे की, ‘तू एनसीबीला नाव सांगू नकोस, म्हणून अनन्याला भेटत आहेस ना.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

इशान खट्टर आणि अनन्याने ‘खाली पीली’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतरपासून इशान खट्टर आणि अनन्या एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान एनसीबीने अनन्याला पांडेला २१ ऑक्टोबर रोजी समन्स पाठवून दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पण ही चौकशी पूर्ण झाली नसल्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा अनन्याला समन्स बजावून बोलावले. यादिवशी अनन्या एनसीबी कार्यालयात वेळेवर हजर राहिली नाही. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्याला झापले. त्यानंतर सोमवारी पुन्हा अनन्याला समन्स बजावून सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आज अनन्या एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहिली नाही.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -