घरमनोरंजनईशान - जान्हवीचं 'झिंगाट'

ईशान – जान्हवीचं ‘झिंगाट’

Subscribe

धडक' हा चित्रपट नागराज मंजुळेच्या 'सैराट'चा रिमेक असून शशांक खेताननं याचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यातील झिंगाट गाणं आज प्रदर्शित झालं आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेल्या मराठी ‘झिंगाट’ गाण्याचा हिंदी रिमेक आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘धडक’ चित्रपटाची आणि त्याहीपेक्षा ‘झिंगाट’ गाण्याचं चित्रीकरण कसं असेल याची चर्चा पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांमध्ये होती. आज ही प्रतिक्षा संपली असून ‘धडक’ मधील ‘झिंगाट’ गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे.

वेगळं ‘झिंगाट’

मराठीतील ‘सैराट’ मधील ‘झिंगाट’ हे गाणं मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकांनीदेखील डोक्यावर उचलून घेतलं. आजही हे गाणं लागल्यानंतर प्रत्येकजण या गाण्यावर थिरकतो. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरनं आपल्या नृत्यानं या गाण्याला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं होतं. त्यामुळं या हिंदी रिमेकमध्ये काय वेगळेपणा असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. ईशान आणि जान्हवीनं यातील वेगळेपणा जपला असून त्यांनी स्वतःची एनर्जी घालून या गाण्याला वेगळेपणा दिला आहे. कदाचित मराठी प्रेक्षक या गाण्यासह मराठी गाण्याची तुलना करण्याची शक्यता आहे. पण हे एक वेगळं गाणं म्हणून पाहिल्यास, त्यामध्ये तुलना करण्याची गरज भासणार नाही. फारच कमी कालावधीत हे गाणं व्हायरल होत आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा

‘सैराट’ चा हिंदी रिमेक ‘धडक’ कडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत येत आहे. आपल्या मुलीला मोठ्या पडद्यावर पाहायची श्रीदेवीची प्रचंड इच्छा होती. मात्र त्याआधीच तिचं निधन झालं. त्यामुळं जान्हवी तिच्या आईचं स्वप्नं पूर्ण करणार का? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. शिवाय ईशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट असला तरीही त्याला हा चित्रपट त्याची अशी ओळख निर्माण करून देईल. ‘धडक’ हा चित्रपट नागराज मंजुळेच्या ‘सैराट’चा रिमेक असून शशांक खेताननं याचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -