‘दृश्यम 2’ ची इशिता दत्ता लग्नाच्या 6 वर्षांनी होणार आई

दृश्यम आणि दृश्यम 2 या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री इशिता दत्ताच्या (Ishita Dutta) घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. इशिता दत्ताला नुकतेच स्पॉट केले गेले तेव्हा ती गरोदर असल्याचे रहस्य उघड झाले. इशिता दत्ता यावेळी बेबी बंप प्लांट करताना दिसली. इशिताने मिडियासमोर पोज दिली आणि तिच्या नवीन लूकचे लोक अभिनंदन करत आहेत. इशिता ही बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे.

इशिता बेबी बंप प्लांट करताना दिसत असली तरी तिने अद्याप प्रेग्नेंसीबाबत कोणतीही पोस्ट किंवा माहिती दिलेली नाही. पण मिडियाच्या कॅमेऱ्याने तिचे हे गुपित समोर आणले आहे. इशिता नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती.

इशिताने 2017 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता वत्सल शेठसोबत लग्न केले. अजय देवगणच्या टार्डन द वंडर कारमधून वत्सलला इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळाली. यानंतर तो ‘एक हसीना थी’ आणि ‘हासील’ या चित्रपटांमध्ये दिसला.

हेही वाचा – उर्फी जावेदला टक्कर देतोय हा पठ्ठ्या; कधी अंगाला भांडी, तर कधी झाडू आणि मिरच्या

इशिताच्या करिअरविषयी सांगायये झाले तर, तिने 2012 मध्ये चणक्युडू या तेलुगू चित्रपटातून करिअरची सुरुवात केली, पण त्या चित्रपटातून तिला ओळख मिळाली नाही. त्यानंतर तिने ‘एक घर बनाऊंगा’ (2013-2014) या मालिकेद्वारे टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेमुळे तिला नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाले. त्यानंतर इशिताने सस्पेन्स थ्रिलर दृष्यम (2015) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ज्यामध्ये अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांनी देखील अभिनय केला होता.

याआधी इशिता गरोदर असल्याची अफवा
दोन वर्षांपूर्वीही इशिता दत्ता (Ishita Dutta) गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्रीने पुढे येऊन या अफवा असल्याचे सांगितले होते. तिने सांगितले की ती गर्भवती नाही. तथापि, यानंतर तिने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दृश्यम 2 साठी शूट केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात तिने अजय देवगण, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू अश्या मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे.

हेही वाचा – कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा… आईच्या सर्जरीनंतर शिल्पा शेट्टीने शेअर केली भावनिक पोस्ट