घरताज्या घडामोडीअभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

Subscribe

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबी याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

४२ वर्षीय बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबी यांने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बातमी कुशलचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांनी खरी असल्याचे सांगितले आहे. मुंबईतल्या वांद्रे मधील आलसीद बिल्डिंगमध्ये राहत्या निवासस्थानी फॅनला नायलॉनची दोरी बांधून त्यांने गळफास घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी राहत्या घरी कुशलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आज दुपारी १ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पण, अजूनही त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. कुशल पंजाबीने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे.

सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी कुशल पंजाबी या अभिनेत्याचे निधन झाले आहे. नैराश्याने त्रस्त झाल्यानंतर अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. कुशल ४२ वर्षांचा होता आणि त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसल आहे. शरारत अभिनेता करणवीर बोहराने सोशल मीडियावर कुशलच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. ‘इश्क मे मरजावा’ या मालिकेत त्याने शेवटचे काम केले होते. त्यानंतर त्याच्या अकालीन निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

- Advertisement -

करणवीर बोहराने शेअर केली बातमी

कुशलच्या आत्महत्येची बातमी करणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली. कुशल आणि करणवीर फार चांगले मित्र होते. करणवीरने कुशलचा फोटो शेअर करत एक भावनिक मेसेज लिहिला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुझ्या निधनाच्या बातमीमुळे मी पुरता हललो आहे. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मला माहितीये तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहशील. ज्या पद्धतीने तू तुझे आयुष्य जगलास तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस.. पण मला काय माहीत होतं…असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.


हेही वाचा – मुंबई – पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात; ६ जण जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -