लारा दत्ताच्या ‘या’ चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण; शेअर केली खास पोस्ट

लारा दत्ताने 'अंदाज' हा पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. 'अंदाज' या चित्रपट रिलीज होऊन २० वर्ष लोटले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta)हिने अभिनयाने लोकांच्या मनात आपला ठसा उमटविला आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी लारा दत्ताने मिस यूनिवर्स हा खिताब आपल्या नाववर केला आहे. यानंतर लारा दत्ता ही अभिनयाकडे वळली. लारा दत्ताने ‘अंदाज’ हा पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल टाकले. ‘अंदाज’ या चित्रपट रिलीज होऊन २० वर्ष लोटले आहेत. या पार्श्वभूमीवर लारा दत्ताने इंस्टाग्रामवर (Instagram) भावुक नोट लिहिली आहे.

लारा दत्ताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटावर एक पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra) आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी देखील काम केले आहे. लाराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, अक्षय नेहमीच तिच्यासोबत राहिल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. आपण दोघी नेहमीच एकमेकींसाठी असणारच आहोत, असे म्हणत तिने प्रियांकाचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

फोटो शेअर करताना लारा दत्ताने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आणि तशीच….. २० वर्षे झाली. किती अविश्वसनीय, लांबचा प्रवास आहे. सर्वप्रथम, या चित्रपटावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल मी प्रेक्षक आणि चाहत्यांची सदैव ऋणी राहीन. सुनील दर्शनने मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी ऑफर दिली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयने मला नेहमीच हसवले आहे. मी तिला फक्त एवढेच म्हणेन की ती कोण आहे.’

अभिनेत्री प्रियांकाचा वेगळा उल्लेख करून लाराने तिची प्रशंसा करताना लिहिले, ‘प्रियांका चोप्रा, आम्ही नेहमीच एकमेकांना सपोर्ट करू. भारतीय चित्रपटसृष्टीने मला जे काही दिले त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. आपण खूप पुढे आलो आहोत आणि आज जेव्हा मी या क्षणी मागे वळून तेव्हा मला खूप छान वाटते.

2003 मध्ये आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज कंवर यांनी केले होते. सुनील दर्शन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात लारा दत्ता, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

 

हेही वाचा – ब्लॅक प्रिंसेस गाऊनध्ये मौनी रॉयचं कान्समध्ये पदार्पण