ITA Awards 2022 : रेड कार्पेटवर बॉलिवूडसह टेलिव्हिजन कलाकारांचा जलवा, पाहा फोटो

आईटीए अवॉर्ड २०२२च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंह, वाणी कपूर, गुलशन ग्रोवर सह करण जोहर हे कलाकार सहभागी झाले होते. अवॉर्ड नाइटचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील कलाकार एका सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे अवॉर्ड फंक्शन्स आणि रेड कार्पेट एंट्री. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आयटीए अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांचा सिलसीला पाहायला मिळाला. या वर्षीचा बहुप्रतिक्षीत असा हा अवॉर्ड फंक्शन मानला जात आहे. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार सहभागी झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आईटीए अवॉर्ड २०२२च्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंह, वाणी कपूर, गुलशन ग्रोवर सह करण जोहर हे कलाकार सहभागी झाले होते. अवॉर्ड नाइटचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आयटीए अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुली संपूर्ण परिवारासह उपस्थित होती. त्याचप्रमाणे, हिना खान, निया शर्मा आणि रश्मी देसाई, गौरव खन्ना, रवि दुबे, निधी शाह सह अनेक कलाकारांनी स्टाइलिश अंदाजात रेड कार्पेटवर दमदार एंट्री घेतली. कलाकारांच्या प्रेंजेंस आणि स्टाइलने या अवॉर्ड फंक्शनला चार चाँद लावले.

या कलाकारांनी मिळवले अवॉर्ड्स

अवॉर्ड फंक्शनमध्ये कलाकारांचा अवॉर्ड्स पटकवला. अभिनेता हर्षद चौप्राला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील डॉ. अभिमन्यु बिडला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. तर दुसरीकडे अभिनेता नकुल मेहताला बडे अच्छे लगते है मधील राम कपूरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ( क्रिटिक्स ) अवॉर्ड देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून अर्थात अनुपमा मालिकेने नंबर मिळवला. त्याचप्रमाणे अनुपमा मालिकेत वनराज शाहची भूमिका साकारणारे सुधांशु पांडे सर्वोत्कृष्ट अभिनेता ( ड्रामा ) ठरले. तर अभिनेत्री हिना खानला लाइन या सिनेमासाठी अवॉर्ड देण्यात आला .

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

अभिनेत्री आलिया भट्ट देखील अवॉर्ड फंक्शनमध्ये गंगूबाई काठियावाडी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली. आलियाच्या साडीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेहमीच आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलने सर्वांचे लक्ष आकर्षित करणाऱ्या रणवीर सिंहने देखील अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती. त्याच्यासोबत ड्राम क्विन राखी सावंत देखील अतरंगी कपड्यात दिसली.


हेही वाचा – ‘सा रे ग मा पा’ ची विजेता ठरली निलांजना रे, ट्रॉफीसह मिळाले 10 लाख रोख रक्कम बक्षीस