घरमनोरंजनकाशिनाथ घाणेकर साकारायला मिळणे माझे भाग्यच - सुबोध भावे

काशिनाथ घाणेकर साकारायला मिळणे माझे भाग्यच – सुबोध भावे

Subscribe

मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास सर्वांना पहायला मिळणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा येत आहे. ही घोषणा झाली आणि सगळ्यांचे लक्ष सध्या या चित्रपटाकडे लागले आहे. चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट बराच चर्चेत राहिला आहे. चित्रपटात सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांची भुमिका साकारत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. यावेळी सुबोध भावे म्हणाला की, मराठी रंगभूमीवर उभे रहाण्याची थोडीशी धडपड करणाऱ्या माझ्यासारख्या कलावंताच्या आयुष्यात मराठी रंगभूमीवरील पहिल्या सुपरस्टारची व्यक्तिरेखा येणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. “आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर” या चित्रपटाच्या माध्यमातून मला डॉ.काशिनाथ घाणेकर यांचे चरित्र आभ्यासायला मिळाले, त्यांच्याविषयी बरीच माहितीदेखील मिळाली. घाणेकरांना जवळून स्पर्श करू शकलो, त्याचबरोबर त्या काळातल्या, त्यांच्याबरोबरच्या अनेक समकालीन ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गजांना देखील स्पर्श करू शकलो. हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी रंगभूमीवरच्या या सर्व मानाच्या आदरांजली दिली आहे.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे, यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. मराठी नाट्यगृहामध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी… कधी लाल्या म्हणून तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात यांनी अढळ स्थान मिळवले. ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी स्वत:चे नाव शेवटी लिहण्याची प्रथा सुरू केली. अश्या या मराठी रंगभूमिवरील पहिल्या सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर होणे. ही प्रेक्षकांसाठी दिवाळी भेट ठरणार आहे.

- Advertisement -

तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार

या चित्रपटात सुबोध भावेसह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमित राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर), अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -