घरताज्या घडामोडीPhotos: भाईजानलाही बसला चक्रीवादळाचा फटका, फार्महाऊसचं झालं नुकसान!

Photos: भाईजानलाही बसला चक्रीवादळाचा फटका, फार्महाऊसचं झालं नुकसान!

Subscribe

सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनं तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील अनेक गावं उद्धवस्त केली. महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. मुबंईसह इतर जिल्ह्यात चक्रीवादळाची तीव्रता सगळ्यांनीच अनुभवली. या वादळाने कोकणातील लोकांच्या घरावरील छप्पर गेले. झाडं पडली, पत्रे उडाले. या वादळाचा सलमान खानला देखील फटका बसला आहे. त्याच्या पनवेल फार्महाऊसचं या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. फार्महाऊसचे वादळानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात या वादळामुळे फार्महाऊसची काय अवस्था झाली हे पाहायला मिळत आहे.

सलमान खानच्या फार्महाऊसचे नुकसान

सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनं तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिनं वादळ येण्याची आधीचे आणि नंतरचे दोन्ही फोटो पोस्ट केले आहेत. युलियानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये या वादळामुळे फार्महाऊसचा काय अवस्था झाली आहे हे बघायला मिळत आहे. फार्म हाऊसच्या परिसरातील अनेक मोठी झाडं यामुळे कोसळली आहेत.

- Advertisement -

अभिनेता सलमान खान सध्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा तो तिथे होता. त्यामुळे खरंतर तो तिथे अडकला. पण तो काही एकटा नव्हता त्याच्यासोबत लुलिया वंतुर, जॅकलिन फर्नांडिस आणि त्याचे काही कुटुंबिय होते. पण चौथा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बांद्र्याला गेला. वडिलांना भेटला आणि पुन्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर परत आला.

- Advertisement -

लॉकडाऊनदरम्यान भाईजानची मात्र एक दोन नव्हे तर चक्क तीन गाणी आणली. एक कोरोनाचं होतं. दुसरं जॅकलिनसोबतचं सिंगल होतं तर तिसरं ईदला त्याने त्याच्या चाहत्यांसाठी आणलं. त्याच्या तीन गाण्यांना तुफान पसंती मिळाली. लवकरच सलमानचा नवकोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


हे ही वाचा – भूमाफियांनी महिलेला शेतात जिवंत जाळले, घटना कॅमेरात कैद!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -