घरमनोरंजनपरिणिती आणि सिद्धार्थची 'जबरिया जोडी'

परिणिती आणि सिद्धार्थची ‘जबरिया जोडी’

Subscribe

'जबरिया जोडी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या समोर परिणिती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र येत आहेत. चित्रपटाचा पहिला लुक नुकताच समोर आला आहे.

चित्रपट ‘हंसी तो फंसी’ नंतर पुन्हा एकदा परिणिती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र येते आहेत. पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक प्रशांत सिंहच्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटाचा पहिला लुक नुकताच समोर आला आहे.

कसा आहे नवा लुक?

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि परिणिती अतिशय रोमँटिक अंदाजामध्ये एक दुसऱ्याला पाहताना आणि सेल्फी काढत असताना दिसत आहेत. पण या रोमँटिक अंदाजाच्या दरम्यान एक नवऱ्याच्या वेषातील माणूस बेशुद्ध पडलेला दिसत आहे. वास्तविक हा चित्रपट नवऱ्याचं अपहरण करण्याच्या कथेवर आधारित आहे. आतापर्यंत सिद्धार्थ नेहमीच आपल्या चित्रपटामध्ये स्टायलिश लुकमध्ये दिसतो. मात्र या चित्रपटामध्ये त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये परिणिती आणि सिद्धार्थ एका बाजारात रोमँटिक होताना दिसत आहेत. या पोस्टरमध्ये त्यांच्यामागे ‘व्हॉट्स अॅप चाऊमिन’ आणि ‘मुर्ग डोनाल्ड’ सारख्या दुकांनाचे बॅनर दिसत आहेत. चित्रपटामध्ये या दोघांचं नाव अभय आणि बबली असं आहे.

- Advertisement -

सध्या चित्रपटाचं चित्रीकरण चालू

या चित्रपटाचं चित्रीकरण लखनऊमध्ये सुरु करण्यात आलं आहे. हा चित्रपट बिहारमधील पाटण गावातील कथेनुसार आहे. मात्र लखनऊमध्ये सेट लावून सध्या चित्रीकरण चालू आहे. तर अपारशक्ती खुराणा या चित्रपटामध्ये परिणितीचा शेजारी म्हणून भूमिका साकारत आहे. असा शेजारी जो तिच्या प्रेमात आहे. या चित्रपटाचं आधी नाव ‘शॉटगन शादी’ असं ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर ते बदलून ‘जबरिया जोडी’ असं ठेवण्यात आलं.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -