घर मनोरंजन शाहरूख खानचा जबरा फॅन; चित्रपटगृहात व्हेंटिलेटर नेत पाहिला जवान चित्रपट...

शाहरूख खानचा जबरा फॅन; चित्रपटगृहात व्हेंटिलेटर नेत पाहिला जवान चित्रपट…

Subscribe

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) चाहते भारतातच नाही तर परदेशातही आहेत. शाहरूख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जवान’ (Jawan) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर  (Box Office) धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून अनेक नवीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकतादेखील चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. शाहरूख खानच्या अशाच एका जबरा फॅनची सध्या प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. कारण तो चक्क व्हेंटिलेटर घेऊन जवान चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहचला होता. या चाहत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Jabra fan of Shah Rukh Khan Watched Jawan movie on ventilator in theater)

हेही वाचा – ‘जवान’च्या सक्सेस पार्टीत शाहरुख-दीपिकाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

शाहरुख खानचा जवान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. अनीस फारुकी असे शाहरुख खानच्या जबरा फॅनचे नाव आहे. तो गंभीर आजारी असतानाही आपल्या सुपरस्टारचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहचला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक शाहरुख खानचे लक्ष त्याच्या जबरा फॅनच्या प्रकृतीकडे वेधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Gupta (@ro_hit_hain)


रोहित गुप्ता नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्राम हँडलवरून शाहरुख खानच्या जबरा फॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या सीन दरम्यान हा जबरा फॅन खूप आनंदी दिसत असल्याचे दिसत आहे. आता लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 41 वर्षीय ‘ही’ अभिनेत्री विचित्र ड्रेसवरुन ट्रोल

दरम्यान, शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट 7 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. चित्रपट पाहताना चाहते शिट्ट्या वाजवताना आणि थिएटरमध्ये नाचताना दिसले. त्याचवेळी, चित्रपटाला त्याच्या पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि सात दिवसानंतरही त्याची कमाई सुरूच आहे. शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत 350 कोटींचा आकडा पार केला आहे. याशिवाय या चित्रपटाने जगभरात 621 कोटींच्यावर कमाई केली आहे. पठाणनंतर शाहरुखच्या या चित्रपटानेही अनेक विक्रम मोडले आहेत.

- Advertisment -