घरमनोरंजनजॅकलीनने असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

जॅकलीनने असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

Subscribe

२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. पण आदल्या दिवशीच तिने ख्रिसमस साजरा केला आहे. मुंबईतील अनाथ मुलांसोबत ख्रिसमस साजरा करत तिने धम्माल केली आहे

अगदी काहीच तासावर ख्रिसमस आला आहे. देशभरात ख्रिसमस साजरा केला जातो. त्यातही सेलिब्रिटींची ख्रिसमस पार्टीही नेहमीच खास असते. पण जॅकलीन फर्नांडिसचा यंदाचा ख्रिसमस खास केला आहे. कारण तिने अनाथ मुलांसोबत आपला दिवस साजरा केला आहे. याचे फोटो तिने नाही तर सलमान खानने ट्विट केले आहेत.. आता तुम्ही सलमानचे अकाऊंट चाळायला जाल.. पण थांबा सलमानचे फॅन पेज चालवणाऱ्या एका फॅनने हे फोटो शेअर केले आहेत आणि जॅकलीनला क्युट सॅन्टा असे म्हटले आहे. पाहा नक्की काय आहेत हे फोटोज

- Advertisement -

जॅकलीनचा ख्रिसमस

२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. पण आदल्या दिवशीच तिने ख्रिसमस साजरा केला आहे. मुंबईतील अनाथ मुलांसोबत ख्रिसमस साजरा करत तिने धम्माल केली आहे. या लहान मुलांसोबत ख्रिसमस साजरा करत असताना तिने त्यांच्यासाठी खास गिटार वाजवल्याचे देखील कळत आहे. म्हणजे जॅकलीनचे फोटो तरी तेच सांगत आहे. ख्रिसमसचा खास गेटअप जॅकलीनने केला आहे. डोक्यावर छान लाल टोपी आणि तोंडावर गोड हसू यामुळे या छोट्यांचा ख्रिसमस मजेत झाला असणार हे मात्र नक्की !

- Advertisement -

रेस३ झाला फ्लॉप

जॅकलीनने सलमान खानच्या ‘रेस 3’ या सिनेमात काम केले होते. पण हा सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यानंतर ती जुडवा २ या सिनेमात दिसली होती. पण त्यानंतर तिचा कोणताही सिनेमा आला नाही. आता या पुढे ती कोणत्या सिनेमात दिसणार यासाठी तिच्या फॅन्सना वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -