michele morrone चे ‘मुड मुड के’ म्युझिक व्हिडीओतून बॉलिवूडमध्ये पदार्पण; Jacqueline सोबत दिसणार केमिस्ट्री

jacqueline fernandez and michael morrones music video first look out
मायकेल मोरोनचे 'मड मुड के' म्युझिक व्हिडिओतून बॉलिवूडमध्ये पदार्पण; जॅकलीन फर्नांडिससोबत झगमगणारी केमिस्ट्री

हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘365 डेज’ फेम अभिनेता मायकेल मोरोन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘मुड मुड के’ या म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत मायकेल मोरोनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

जॅकलिन फर्नांडिसने या गाण्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज केला आहे. दोघांची धमाकेदार केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मायकेल मोरोन हा पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत झळकणार आहे. जॅकलीन आणि मायकेल मोरोन यांनी देसी म्युझिक फॅक्टरीसोबत मिळून हा व्हिडीओ केला आहे. या गाण्याचा टीझर 8 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

या पॅपी ट्रॅकला टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी आवाज दिला आहे. जॅकलिन आणि मिशेल मॉरोन यांच्यातील केमिस्ट्रीने सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या गाण्यातील दोघांचा एक फोटो जॅकलीनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यातून हा म्युझिक व्हिडीओ खूपच रोमँटिक असणार असल्याचे दिसून येते.

मायकेल मोरोनसोबतच्या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॉट ब्रेकिंग न्यूज सांगत आहे. हा माझ्या येणाऱ्या म्युझिक व्हिडिओचा फर्स्ट लूक आहे. इंटरनॅशनल सेंसेशन मायकेल मोरोन यात दिसणार आहे. मायकेल मोरोनचे इंडियन म्यूझिक व्हिडीओमध्ये स्वागत आहे. येथे गरमी वाढतेय. मुड मुड गाण्याचा टीझर देसी म्युझिक फॅक्टरीच्या सहकार्याने 8 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल. कनेक्टेड रहा. हे गाणे टोनी आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे.

जॅकलीन फर्नांडिसच्या या पोस्टवर मायकेल मोरोननेही कमेंट केली आहे. अरे हो, नक्कीच. तुमचे धन्यवाद. याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील जॅकलिनचे मित्र परिवारही तिच्या नव्या गाण्याला सपोर्ट करत फर्स्ट लूक खूपच आवडल्याचे सांगत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा लूक खूपच इंटरेस्टिंग वाटतोय.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्या, जॅकलिनने नुकतेच अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता मायकेल मोरोनसोबतचा नवा म्युझिक व्हिडिओ देखील रिलीजसाठी तयार आहे. याशिवाय जॅकलीन आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतच्या लव्ह अँगलमुळे देखील चर्चेत आहे.