‘फतेह’ चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि सोनू सूद दिसणार एकत्र

बॉलीवूड दिवा जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच रिलीज झालेल्या ‘सर्कस’ चित्रपटातील तिच्या सुंदर रेट्रो लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. तसेच, 2023 मध्येही जॅकलिनला तिच्या जबरदस्त लाइनअपसह चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळेल. अशातच, अभिनेत्री लवकरच सोनू सूदसोबत त्यांचा आगामी चित्रपट ‘फतेह’साठी हातमिळवणी करणार असून दोन्ही कलाकार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रांत रोना’ चित्रपटातील ‘रा रा रक्कम्मा’या गाण्याने जॅकलिन फर्नांडिसला ब्लॉकबस्टर यश मिळाले. तसेच, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनी अभिनेत्रीच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुकदेखील केले. याशिवाय ‘सर्कस’ चित्रपटातील तिचा कधीही न पाहिलेला विंटेज लूकही सर्वांना आवडला आहे.

याशिवाय जॅकलिन च्या ‘क्रॅक’चीही नुकतीच घोषणा करण्यात आली असून अभिनेत्री हॉलिवूड प्रोजेक्ट ‘टेल इट लाइक अ वुमन’मध्येही दिसणार आहे.


हेही वाचा :

इतरांप्रमाणे माझ्यात दिखावूपणा नाही… श्रुती हासनने सांगितलं इंडस्ट्रीमधील सत्य