Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जॅकलीन फर्नांडीसने केली योलो (YOLO) फाउंडेशनची स्थापना, एक लाख लोकांपर्यंत पोहोचवणार जेवण

जॅकलीन फर्नांडीसने केली योलो (YOLO) फाउंडेशनची स्थापना, एक लाख लोकांपर्यंत पोहोचवणार जेवण

तसेच समाजात चांगुलपणा पसरवण्यासाठी सदैव राहणार प्रयत्नशील राहणार असल्याचे जॅकलीनचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने दररोजच्या आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच गरजू लोकांच्या मदतीसाठी एका फाउंडेशनची स्थापना केली असून या चांगल्या आणि समाजोपयोगी कामासाठी जॅकलीनने अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत हातभार लावणार आहे तसेच समाजाच्या हितासाठी अतिशय उपयुक्त काम करून तळागाळापर्यंत जाऊन लोकांची मदत करणार आहे.‘रोटी बैंक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलीन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार असून फीलाइन फाउंडेशनसोबत,भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम देखील सुरू केला आहे.

- Advertisement -

त्यासोबतच, कोविड काळातील फ्रंट लाइन कार्यकर्ता मुंबई पोलिस दलाला मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात येणार आहे. जॅकलीन फर्नांडीस कठीण काळात ज्यांना सर्वाधिक गरज होती त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे, मग ते पूरग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण करने असो की मुलांच्या पोषणासाठीचे कार्य, आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने अनेक लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे. तसेच समाजात चांगुलपणा पसरवण्यासाठी सदैव राहणार प्रयत्नशील राहणार असल्याचे जॅकलीनचे प्रयत्न सुरू आहेत.


हे हि वाचा – कंगनाची टिव टिव बंद ! कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

- Advertisement -