जॅकलीनची किलर स्माईल सोशल मीडियावर व्हायरल

बॉलीवूडची देखणी आणि चंचल अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिचा हटके फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाँड्रीमध्ये कपडे धुतानाचे तिचे मजेशीर फोटो तिने शेअर केले आहे.

बॉलीवूडची हॉट अँड ब्युटीफुल अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा स्माईल फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जॅकलीन नेहमीच तिच्या अभिनय, नृत्य आणि फिटनेससाठी चर्चेत राहिली आहे. मात्र तिला कपडे धुण्याचीही आवड असल्याचे आता समोर आले आहे. जॅकलीन सकाळी सकाळी लाँड्रीमध्ये दाखल झाली असून या ठिकाणी मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. जॅकलीनने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. डोळा मारणारी, क्युट स्माईल देणार जॅकलीन ब्लॅक अँड व्हाइट फोटोत अत्यंत सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Laundry Day ? thanks for the company @ayosphoto

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

जॅकलीनचा ‘लाँड्री डे’ 

वॉशिंग मशीन सोबतच्या फोटोमध्ये जॅकलीन क्रॉप टॉप आणि हाय वेस्ट जीन्समध्ये दिसत असून हॉट अन सिझलिंग पोज तिने दिली आहे. आपल्या फोटोसोबत तिने ‘लाँड्री डे’ अशी ओळ दिली आहे. जॅकलीनने सध्या चित्रपटातून मोठा ब्रेक घेतला आहे. सध्या ती मोठ्या सुट्टीवर असून व्हेकेशनची मजा घेत आहे. ही सुट्टी फुल ऑन मस्ती, कुटुंबिय आणि मित्रांसोबत घालवताना ती दिसत आहे.

jacqueline fernandez
जॅकलीन फर्नांडीस (सौजन्य- इंस्टाग्राम)

सुट्टीवर सुरू असताना करतेय धमाल 

यंदाच्या वर्षात जॅकलीनचे बरेच चित्रपट प्रदर्शीत होत आहेत. नोव्हेंबर महिन्यात तिचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतचा ‘ड्राइव्ह’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटातील कलाकार कार्तिक आयर्नसोबतच्याही चित्रपटात जॅकलीन दिसणार आहे. कन्नड भाषिक ‘किरिक पार्टीके’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये या दोघांची जोडी पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.