घरमनोरंजनस्वत:ला कधी वाईट समजू नका; ट्रोलिंग, एकटेपणावर जॅकलिन फर्नांडिस व्यक्त

स्वत:ला कधी वाईट समजू नका; ट्रोलिंग, एकटेपणावर जॅकलिन फर्नांडिस व्यक्त

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या जॅकलिन फर्नांडिस बच्चन पांडेच्या स्टारकास्टसोबत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अशातच जॅकलिनने अभिनेत्री शिल्पा शेट्टी च्या शो शेप ऑफ यू या शोमध्ये एककापणा आणि ट्रोलिंगसंदर्भात अनेक खुलासा केले आहेत.

शिल्पाच्या या शोमध्ये जॅकलीन फर्नांडिसने ट्रोलर्ससोबत कसे वागते याबाबतही बोलली आहे. जॅकलीनने सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याबाबत शिल्पाने जॅकलिनला विचारले की, ट्रोलर्सचा सामना तू कशाप्रकारे करतेस? यावर जॅकलिन म्हणाली की, गेल्या काही वर्षांत मी शिकले आहे की, या सर्व गोष्टींचा प्रभाव पडून तुम्ही स्वत:ला वाईट समजू नका. स्वतःला त्या लोकांसारखे बनवू नका. हे खूप महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

जॅकलीन पुढे म्हणाली की, अनेकवेळा तुम्ही असे काहीतरी लिहिता आणि त्याचे युद्धात रूपांतर होते, हे तुम्हाला माहीतही नसते. ज्याची गरजही नाही. हे तुम्हाला खूप वाईट व्यक्ती बनवू शकते. यातून तुम्ही खूप वाईट व्यक्तीला असल्याचे वाटू शकते. लोकांच्या बोलण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज नाही. आनंदी रहा आणि सकारात्मक रहा.

जॅकलीनला फर्नांडिसने पहिल्या लॉकडाऊनपासून एका थेरपीची गरज पडली होती. यावरही जॅकलिनने भाष्य केले. 2020 मध्ये तिला खूप एकाकी वाटत होते. त्यामुळे तिला थेरपीचा आधार घ्यावा लागला होता. यावर जॅकलिन म्हणाली की, कोरोना महामारीनंतर लगेचच 2020 चा काळ होता. मला वाटते की, आम्ही सर्व त्या वेळी गोष्टींमधून गेलो होतो. लोकांना कळत नव्हते ते काय करत होते. लोक नोकऱ्यांसह आपल्या अनेक जवळच्या व्यक्तींना गमावत होते. मला त्यावेळी मी एकाकी पडली होती, शहरात असे अनेक लोक आहेत कुटुंबापासून एकटे राहतात. मला आयुष्यातील अनेक अडचणींमधून लोकांना गोंधळात टाकायला आवडत नाही. तसेच दु:ख दायक आणि निराशाजनक घटनांवर बोलणे आवडत नाही.

- Advertisement -

जॅकलिनने पुढे म्हटले की, ज्यावेळी तिला अस्वस्थ, दु:खी आणि एकटे वाटते त्यावेळी तिला कुटुंबियांसोबत आणि मित्र परिवाराला सांगणे आवडत नाही, माझ्याकडे एक अद्भुत डॉक्टर आहे. ज्याच्याकडे मी काही काळ थेरपी घेतली,

सुकेश चंद्रशेखर मनी लॉड्रिंग प्रकरणामुळे जॅनलिन फर्नांडिस चांगलीच अडचणीत सापडली आहे. या प्रकरणामुळे तिने आजही अनेक टीकेचा सामना करावा लागतोय. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास जॅकलिन फर्नांडिसचा बच्चन पांडे हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत अक्षय कुमार आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बच्चन पांडेनंतर जॅकलीन जॉन अब्राहमसोबत अटॅकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


ह्रतिक रोशनच्या ‘Krrish 4’ सिनेमाबाबत राकेश रोशनचा ‘मास्टर प्लॅन’; ‘या’ दिवशी होणार रिलीज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -