Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जॅकलिन म्हणतेय ''तुझे दिल दे दिया'', राधे चित्रटातील नवीन गाणं प्रदर्शित

जॅकलिन म्हणतेय ”तुझे दिल दे दिया”, राधे चित्रटातील नवीन गाणं प्रदर्शित

या गाण्यात सलमान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या दोघांचा ऑनस्क्रिन जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा रॉबिनहूड सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरला सर्वच प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. अॅक्शन आणि स्वॅग असलेल्या या चित्रपटाची खासीयत म्हणजे सलमानचा किसींग सीन होता. ‘राधे’च्या या धमाकेदार ट्रेलर मधून चाहत्यामध्ये चित्रपटाबाबत आणखीनच उत्साह वाढला आहे. आता या चित्रपटातील एक नवं कोरं गाणं प्रदर्शित झाले आहे. ‘दिल दे दिया’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात सलमान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या दोघांचा ऑनस्क्रिन जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस पडले आहे. हिमेश रेशमियानं या गाण्याला संगीत दिलं असून शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. हे गाणं, कमाल खान आणि पायल देव यांनी गायलं असून शबीना खाननं कोरियोग्राफ केलं आहे. दिशा आणि सलमान प्रमाणेच जॅकलिन आणि सलमानची सिझलिंग कॅमिस्ट्रिसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकायला लावणार हे नक्की…

- Advertisement -

‘दिल दे दिया’ गाण्यातील मुख्य अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या डान्सनंबर विषयी बोलताना म्हणाली की, ”सलमानसोबत काम करण्याचा अनुभव सर्वोत्तम असतो. त्याची एनर्जी दमदार असते. राधे मधील ‘दिल दे दिया’ माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं माझ्या आतापर्यंतच्या डानंस नंबरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. सोबतच, डान्सिंग स्टार प्रभुदेवा सरांसोबत काम करणे हा एक जबरदस्त अनुभव होता. आम्ही या गाण्याच्या शूटिंगदरम्यान खूप धमाल केलीये. मला यात काम करण्याची प्रचंड इच्छा होती..”


हे वाचा-  ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्याला भाजपच्या आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी

- Advertisement -