प्रसिद्ध तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू हे त्यांच्या अथिर्निचल नावाच्या टेलिव्हिजन शोसाठी डबिंग करत असताना अचानक बेशुद्ध पडले . त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक नुकतेच रजनीकांतचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’मध्ये दिसले होते. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी शुक्रवारी X वरून (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. (Jailer Actor Death Tamil actor and director G Marimuthu passed away due to cardiac arrest )
तमिळ टेलिव्हिजन मालिकेतील एथिर्नीचलच्या भूमिकेतून जी मारिमुथू यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी चित्रपट निर्माता मणिरत्नम आणि इतरांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
रमेश बाला यांनी ट्विट केलं की, “धक्कादायक, लोकप्रिय तमिळ पात्र अभिनेते मारिमुथू यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीकडेच, त्यांच्या टीव्ही मालिकेतील संवादांसाठी त्यांनी प्रचंड वाहवाही मिळवली होती… त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
जी मारीमुथू यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जी. मारीमुथू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नई येथील त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांच्या मूळ गावी थेणी येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचवेळी, त्यांच्या आकस्मिक निधनाने तमिळ इंडस्ट्रीला धक्का बसला असून अनेक सेलिब्रिटी आणि चाहते अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
मारिमुथु त्याच्या अथिर्निचल या टीव्ही शोमुळे ते खूप प्रसिद्धीझोतात आले. डेली सोपमधील आदिमुथु गुणसेकरन या व्यक्तिरेखेमुळे ते घरोघरी पोहोचले. टीव्ही शोमधील ‘हे, इंदम्मा’ हा त्यांचा लोकप्रिय डायलॉग इंटरनेट सेन्सेशन बनला होता. त्यांनी 1999 मध्ये अजित कुमार यांच्या ‘व्हॅली’ चित्रपटात सहायक भूमिका साकारून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी दिग्दर्शक वसंत यांच्या नेतृत्वाखाली आसीमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. या चित्रपटात अजित, सुवलक्ष्मी आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते. 2008 मध्ये, मारीमुथूने प्रसन्ना आणि उदयथारा अभिनीत कन्नम कन्नम या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी केवळ चित्रपटाचे दिग्दर्शनच केले नाही तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद देखील लिहिले होते . त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनातून बराच ब्रेक घेतला आणि 2014 मध्ये पुलिवाल चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. प्रसन्ना आणि वेमल अभिनीत थ्रिलर नाटक 2011 च्या मल्याळम चित्रपट चप्पा कुरीशूचा रिमेक आहे.
मारीमुथूच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक सहाय्यक भूमिकांमध्ये लोकप्रियता मिळवली. यामध्ये युधम सेई (२०११), कोडी (२०१६), बैरवा (२०१७), काडैकुट्टी सिंगम (२०१८), शिवरंजिनीम इनुम सिला पेंगलम (२०२१), आणि अतरंगी रे (२०२१) या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.
(हेही वाचा: Photo : प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक )