Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन रजनीकांतच्या Jailer सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पार केला 400 कोटींचा आकडा

रजनीकांतच्या Jailer सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पार केला 400 कोटींचा आकडा

Subscribe

सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा जेलर गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइट मध्ये आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यासाठी धमाकेदार अॅडवान्स बुकिंग झाली. तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर थलाइवाला पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून गर्दी केली जात आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासह बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई सुद्धा केली आहे. सिनेमाने 48.35 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. दोन्ही दिवशी तमिळ भाषेतील कलेक्शन हे सर्वाधिक होते.(Jailer movie box office collection)

रजनीकांतचा सिनेमा जेलरने तिसऱ्या दिवशी 34 कोटींचे कलेक्शन केले तर चौथ्या दिवशीच्या कमाईचा आकडा 42 कोटींच्या आसपास होता. पाचव्या दिवशी सिनेमाने 28 कोटी रुपये कमावले आणि आता Sacnilk यांच्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमा सहाव्या दिवशी 38 कोटी रुपये कमावू शकते असा अंदाज लावला आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास कळेल की, एकूण कमाई 6 दिवसात 216 कोटींच्या आसपास असेल. तर वर्ल्डवाईड हा आकडा 400 कोटींच्या पार पोहचू शकतो.

- Advertisement -

रजनीकांतचा सिनेमा जेलरचे बजेट 200 कोटींचे आहे. सिनेमातील गाणे कालावा सोशल मीडियात खुप ट्रेंन्ड करत आहे. त्यामध्ये तमन्ना भाटियाने आपल्या दमदार डांन्स मूव्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


- Advertisement -

हेही वाचा- ‘गदर 2’ला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल धर्मेंद्र यांनी मानले आभार

- Advertisment -