घरमनोरंजनजैन यांच्या निमित्ताने आरजे बॅन्ड

जैन यांच्या निमित्ताने आरजे बॅन्ड

Subscribe

गायक, संगीतकार आणि शीघ्र कवी म्हणून रविंद्र जैन यांचे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मानाचे स्थान होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब शास्त्रीय संगीत आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक होते. वडिलांकडून प्रेरणा घेऊन जैन यांनी त्याचे अध्ययन केले. पुढे या प्राप्त केलेल्या विद्येला संगीताची जोड देऊन संस्कृत श्लोक श्रवणीय होतील हे त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास लक्षात घेतला तर पौराणिक कथांना संगीत दिल्याचे अधिक पहायला मिळते. रामानंद सागर यांनी त्यांच्या विद्वत्तेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. रामायण या अजरामर मालिकेला त्यांनी संगीत दिलेले आहे. पुढे लव-कुश ही स्वतंत्रपणे मालिका करण्याचे ठरले त्यातसुद्धा जैन यांचेच संगीत होते. ज्ञानदानाचे कार्य त्यांच्या आई-वडिलांपासून सुरु झाले. पुढे त्यांनी ते जपले. रविंद्र जैन अकॅडमीची स्थापना केली. संगीतात करिअर करु पहाणार्‍या कलाकारांना शिक्षणही दिले. या शिष्यांनी एकत्र येऊन गीत गाता चल हा विशेष कार्यक्रम जैन यांच्या 75 व्या जयंतीचे निमित्त घेऊन सादर करण्याचे ठरवलेले आहे.

जैन स्वत: परंपरेने आलेल्या संगीताचा आग्रह धरत असले तरी रसिकांच्या बदलत्या इच्छेप्रमाणे संगीतातही बदल हा व्हायला हवा असे त्यांचे म्हणणे होते. शिष्यांना त्या पद्धतीने ते मार्गदर्शनही करत होते. गीत गाता चल हा कार्यक्रम 2 मार्च या दिवशी ष्णमुखानंद येथे होणार आहे. आरजे बॅन्ड या नावाने हे विद्यार्थी जैन यांना संगीतमय आदरांजली वाहणार आहेत. यासाठी सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, लेस्ले लुईस, मनोज मुनताशीर या गायक कलाकारांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेले आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगणा या नात्याने हेमा मालिनी या जैन कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्य पाहुण्या म्हणून त्या उपस्थित राहणार आहेत. 28 फेब्रुवारी या दिवशी त्यांची जयंती असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -