घरमनोरंजनआंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात जालनावाला कलानिकेतनचे यश

आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात जालनावाला कलानिकेतनचे यश

Subscribe

ग्वाल्हेर येथे नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या ग्रीन वुड्स पब्लिक स्कूल उद्भव उत्सव या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात नवी मुंबईच्या जालनावाला कलानिकेतनच्या चमूने शास्त्रीय नृत्य गटात द्वितीय पारितोषिक पटकावले. कलानिकेतनच्या संचालिका अनुराधा जालनावाला यांच्या मार्गदर्शनालाखाली प्रथमच या नृत्य महोत्सवात सहभागी झालेले नवी मुंबईतील विद्यार्थी प्रसन्न आचार्य, रितिका शेट्टी, प्रथा पांडे, ओजस्विता पालकर, स्नेहा रेड्डी, तमन्ना भरत आणि श्राव्या शेट्टी यांनी शास्त्रीय नृत्य गटात भरतनाट्यम शैलीत गणेश कृती आणि तिल्लाना नृत्य सादर करुन महोत्सवात बाजी मारली.

या महोत्सवात श्रीलंका, बल्गेरिया आणि टर्की या देशांसह भारतातून भोपाळ, इंदौर, हिस्सार, गुडगाव, ग्वाल्हेर, रायपूर, लखनऊ, नागपूर, औरंगाबाद, चेन्नई, बंगलोर येथील नृत्य चमुंनी सहभाग घेतला होता. गत 15 वर्षांपासून उद्भव स्पोर्टस् अ‍ॅन्ड कल्चरल असोसिएशन ग्वाल्हेरद्वारा या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या महोत्सवातील विजेत्यांना परदेशात आयोजित केल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भाग घेण्यास आमंत्रित केले जात असल्याची माहिती नृत्यशिरोमणी अनुराधा जालनावाला यांनी दिली.या महोत्सवाच्या निमित्ताने ग्वाल्हेर शहरात पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या स्वागत रॅलीमध्ये महाष्ट्रीयन पोशाखात दाखल झालेल्या जालनावाला कलानिकेतनच्या चमुने लेझीम नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -