घरमनोरंजनजान्हवी-ईशानचा धमाल Video! पाहून तुम्हीही हसाल

जान्हवी-ईशानचा धमाल Video! पाहून तुम्हीही हसाल

Subscribe

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा हा मजेशीर व्हिडीओ पाहिल्यावर, तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडीयावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. देशभरातील तमाम लोकांची या व्हिडीओला भरभरुन पसंती मिळते आहे. हा व्हिडीओ आहे जान्हवी आणि ईशानचा. सध्या ईशान आणि जान्हवी हे दोघं भलतेच चर्चेत आहेत. ‘धडक’ या त्यांच्या आगामी सिनेमामुळे सध्या सर्वत्र त्यांचाच बोलबोला आहे. अशातच त्यांचा हा स्पेशल व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा ते लाईमलाईटमध्ये आले आहेत. तुम्हीही पाहा हा धमाल व्हिडीओ :

हा व्हिडिओ धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडाओमध्ये ईशान जान्हवीची चांगलीच खिल्ली उडवताना दिसतो आहे. एअरपोर्टवरच्या एका पिझ्झा शॉपमध्ये जान्हवी ऑर्डर देत आहे. ऑर्डर देताना काही ठिकाणी जान्हवी अडखळल्याचं आपल्याला दिसतं आणि नेमकं यावरुनच ईशान तिची खिल्ली उडवत आहे. ‘प्रमोशनच्या हेक्टिक शेड्यूल आणि फ्लाइट लेट या दरम्यान काय होतं पाहा…’ अशाप्रकारचं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘धडक’चा बोलबाला… 

धडक या सिनेमाची सध्या सर्वच स्तरांतून चर्चा होते आहे. सैराट या सुपरहिट मराठी सिनेमाचा धडक हा हिंदी रिमेक आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा आहे. धडकच्या निमित्ताने ही फ्रेश जोडी बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननी सिनेमाची निर्मिती केली असून, शशांक खेतानाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. धडकच्या ट्रेलरला आणि सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. आता प्रत्यक्षात हा सिनेमा काय कमाल दाखवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -