जान्हवी बनणार वरुणची हिरोईन

करण जोहर सध्या एका ऐतिहासिक सिनेमामध्ये व्यग्र आहे. या सिनेमासाठी त्याने जान्हवीची एका रोलसाठी निवड केली आहे. औरंगजेब आणि दाराशिकोह यांची ही कहाणी असून हीराबाई जैनाबादीची भूमिका जान्हवी वठवणार आहे.

varun_janhavi
वरुण आणि जान्हवी शेअर करणार स्क्रिन

सैराट रिमेक धडकमधून पदार्पण केलेली जान्हवी कपूर अल्पावधीत अनेक तरुणांच्या ह्रदयाची ताईत बनली. धडकमधील तिचा अभिनय अनेकांना तसा कच्चा वाटला. पण तिच्या अदांनी मात्र तिने अनेकांना घायाळ केले. या सिनेमानंतर आता ती पुढे कोणत्या सिनेमात दिसणार ? अशी उत्सुकता तिच्या फॅन्सना असताना ती करण जोहरच्या तख्त या सिनेमात दिसणार हे कळलं आणि आता आणखी एक सिनेमा तिच्या पदरात पडला आहे. या सिनेमात ती वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत

कोणता सिनेमा?

दिग्दर्शक शशांक खैतान एक थ्रीलर सिनेमा बनवत आहे. यात वरुण एका डिटेटिव्ह एजंटची भूमिका साकारणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या सिनेमाचे नाव अद्याप कळले नसले तरी या सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

आलियामुळे मिळाली संधी

वरुण धवनसोबत या सिनेमात आलिया भटची निवड झाली होती. पण आलियाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तिने हा सिनेमा सोडल्याचे देखील समजत आहे. याचमुळे शंशाकने या सिनेमासाठी जान्हवीची निवड केली आहे.

तख्तमध्येही दिसणार जान्हवी

करण जोहर सध्या एका ऐतिहासिक सिनेमामध्ये व्यग्र आहे. या सिनेमासाठी त्याने जान्हवीची एका रोलसाठी निवड केली आहे. औरंगजेब आणि दाराशिकोह यांची ही कहाणी असून हीराबाई जैनाबादीची भूमिका जान्हवी वठवणार आहे. इतिहासकार कॅथरीन ब्राऊन यांच्या एका लेखात हीराबाईचा उल्लेख आहे. त्यांच्या लेखानुसार जैनाबादी एक सुंदर नायिका आणि नर्तिका होती.