Janhvi Kapoor: साऊथ इंडियन लूक करुन जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती तिरुमालाच्या दर्शनाला

Janhvi Kapoor arrives at Tirupati Tirumala Temple with South Indian look
Janhvi Kapoor: साऊथ इंडियन लूक करुन जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती तिरुमालाच्या दर्शनाला

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. जान्हवी सध्या आंध्र प्रदेशच्या तिरुपती तिरुमाला दौऱ्यावर आहे. जान्हवीचे तिरुपतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिरुपती मंदिरात पूजा अर्चा करुन जान्हवीने देवाचे आशिर्वाद घेतले. दरम्यान जान्हवीच्या साऊथ इंडियन लुकमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जान्हवीने तिरुपती दर्शनासाठी खास साऊथ इंडियन लुक केला होता. साऊथ इंडियन स्टाइल साडीमध्ये जान्हवी फार सुंदर दिसत होती. यावेळी जान्हवीसोबत तिचे मित्र मैत्रिणीही होते. सर्वांनी रंगनायकुलु मंडपात पुजाऱ्याकडून प्रसाद घेत देवाचे आशिर्वाद घेतले.

जान्हवीला धार्मिक यात्रा करायला फार आवडते. ती सतत देव दर्शनाला जात असते. गेल्या महिन्यातच जान्हवी सारा अली खानसोबत केदारनाथ दर्शनाला गेली होती. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जान्हवी आई श्रीदेवीच्या वाढदिवसादिवशी तिरुपती वेंकटेश्वराच्या मंदिरात दर्शानाला गेली होती तेव्हा अनवाणी पायाने ३५०० पायऱ्या चढत तिरुपतीचे दर्शन घेतले होते.

आंध्र प्रदेशमधील तिरुमाला मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. जगात हिंदू मंदिरातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपती तिरुमाला मंदिर ओळखले जाते. अनेक कलाकार त्यांच्या नव्या कामाची सुरुवात तिरुपतीचे दर्शन घेऊन करतात. जान्हवी कपूर आणि तिरुपतीचे खास कनेक्शन आहे. जान्हवीची आई म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी साऊथ इंडियन होती त्यामुळे लहानपणापासूनच तिने दोन्ही मुलींना साऊथ संस्कृतीची ओळख करुन दिली होती.

जान्हवीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर जान्हवीचे कपूर २०२२मध्ये जवळपास ३ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोस्ताना २, गुड लक जेरी आणि मिली हे तिने सिनेमे २०२२मध्ये रिलीज होणार आहेत. जान्हवी २०२०मध्ये जान्हवीचा रुही हा एकच सिनेमा रिलीज झाला. या वर्षात ती  तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत आली होती.


हेही वाचा – अभिनेत्री यामी गौतम करतेय ‘या’ आजाराचा सामना, तरीही जपलंय निखळ सौंदर्य