घरमनोरंजन'मिली' चित्रपटात जान्हवी कपूर नव्या भूमिकेत; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘मिली’ चित्रपटात जान्हवी कपूर नव्या भूमिकेत; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Subscribe

या चित्रपटात जान्हवीने नव्या प्रकारची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘मिली’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जान्हवीने नव्या प्रकारची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. दरम्यान, प्रदर्शित झालेला हा टीझर सस्पेंसने भरलेला आहे. या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर असून जान्हवी आणि बोनी कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

जान्हवीच्या ‘मिली’ चित्रपटाचे दिग्दर्शन मथुकुट्टी जेवियर यांनी केले असून हा चित्रपट मल्याळममधील ‘हेलेन’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी व्यतिरिक्त सनी कौशल आणि मनोज पाहवाभी देखील आहेत. टीझरच्या सुरुवातीला जान्हवी स्वतःला टेपने गुंडाळताना दिसत आहे. ती एका अशा खोलीत अडकलेली आहे. जिथलं तापमान हळूहळू कमी होत आहे. जान्हवी या खोलीतून स्वतःला बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी मिनी नौडियाल ही भूमिका साकारताना दिसत आहे.

- Advertisement -

या दिवशी प्रदर्शित होणार ‘मिली’

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीचा हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मथुकुट्टी जेवियर यांनी केले असून बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. या चित्रपटानंतर जान्हवीचा ‘मिस्टर एंड मिसेज माही’ आणि ‘बवाल’ चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘बिग बॉस’चे घर विनयभंग करणाऱ्यांसाठी… MeToo प्रकरणातील साजिद खानवर शर्लिन चोपडाचा आक्षेप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -