घरमनोरंजनRamayan Movie: रणबीरच्या 'रामायण' सिनेमातून साई पल्लवी आऊट?

Ramayan Movie: रणबीरच्या ‘रामायण’ सिनेमातून साई पल्लवी आऊट?

Subscribe

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. ‘आदिपुरुष’नंतर आता दिग्दर्शक नितेश तिवारी आता करत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’ स्टार यश हा ‘रावण’ म्हणून दिसणार आहे.

या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे. इतकंच नव्हे तर तो यासाठी मांसाहार व मद्यपानही बंद करणार असल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवा अपडेट समोर येत आहे. या चित्रपटात आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट सुद्धा दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला अन् तिच्या ऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार हे स्पष्ट झालं. परंतु आता साई पल्लवी ऐवजी दुसरीच अभिनेत्री ही भूमिका साकारणार अशी चर्चा सुरू झाली.

- Advertisement -

बॅालिवुडची लोकप्रिय अभिनेती जान्हवी कपूर रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जान्हवी कपूरने या आधी नितेश तिवारींच्या बवाल सिनेमात अभिनय केला होता. त्यावेळी साईऐवजी आता जान्हवीला सिनेमात सीतामाईंच्या भूमिकेत संधी दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे साई पल्लवीच्या चाहत्यांमध्ये निराशा झाली आहे. रामायण सिनेमात आता रणबीरसोबत सीतेच्या भूमिकेत जान्हवी कपूर दिसणार आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मीडिया रीपोर्टनुसार रणबीर कपूर व यश या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. तर यात हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहे या गोष्टीचीही पुष्टी झालेली आहे. अद्याप चित्रपटाचं प्री-प्रोडक्शन काम सुरू असून मार्च मध्ये याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘रामायण’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितीश तिवारी यांनी ‘रामायण’ चित्रपटातील राजा दशरथच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत राम अर्थात अभिनेते अरुण गोविल यांच्याशी संपर्क साधला आहे. आता ‘रामायण’ या चित्रपटात राजा दशरथाची भूमिका साकारण्यास अरुण गोविल यांनी होकार दिल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -