HomeमनोरंजनJanhvi Kapoor : जान्हवी कपूरचे 2024 मधले लक्षवेधी लूक्स

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचे 2024 मधले लक्षवेधी लूक्स

Subscribe

 जर तुम्ही 2025 मध्ये लग्न आणि पार्टी सीझनसाठी तयार असाल, तर येथे नमूद केलेल्या जान्हवी कपूरचे लूक वापरून तुम्ही स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक मिळवू शकता!

फॅशनच्या दृष्टीने 2024 हे वर्ष खूप खास ठरले. या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत फॅशन आणि स्टाइलमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. यावर्षी बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांच्या आउटफिट्समध्ये बरेच प्रयोग केले. आधुनिक आणि पारंपरिक यांच्या फ्युजनने बॉलिवूड अभिनेत्रींचे सौंदर्य वाढवले. यावर्षी, अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या फॅशन स्टाइलने, विशेषतः लग्न आणि पार्टी लुकच्या बाबतीत चर्चेत आली आहे. जान्हवीची स्टाइल क्लासी, ग्लॅमरस आणि ट्रेंडी आहे, ज्यामुळे ती प्रत्येक वेळी फॅशन आयकॉन बनली. नवीन वर्षाच्या पार्टीत आणि लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये तुमचे पोशाख स्टायलिश आणि आकर्षक असावे असे तुम्हालाही वाटत असेल, तर तुम्ही जान्हवी कपूरच्या लग्नाच्या आणि पार्टीच्या लूकपासून आयडिया घेऊ शकता.

Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

2024 मध्ये जान्हवी कपूरच्या वेगवेगळ्या साडी स्टाइलने चाहत्यांना वेड लावले. आता पाहा तिचा हा पांढऱ्या साडीचा लूक. ज्यामध्ये संपूर्ण साडीवर केशरी रंगाची फुले लावलेली आहेत. जान्हवीचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीने ही साडी प्लेन ऑरेंज कलरच्या ब्लाउजसोबत पेअर केली आहे. त्याच वेळी, हेअरस्टाईलमध्ये साइड पार्टीशन करून, केसांना थोडेसे पफ स्टाईल देऊन समोरून केस पिन केले आहेत आणि कपाळावर साध्या लाल टिकलीने लूक पूर्ण केला आहे. एकूणच, जान्हवीचा हा लूक खूपच सुंदर आणि सोबर दिसत आहे, जो तुम्ही कोणत्याही लग्नाच्या पार्टीत रिक्रिएट करू शकता.

- Advertisement -
Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

जा्न्हवीने बिकिनी स्टाईल ब्लाउजसह पेअर केलेल्या या मरून रंगाच्या साडीतही ती खूप स्टायलिश दिसतेय. जान्हवीने तिच्या केसांना सेंटर पार्टीशन आणि वेव्ही लुक देऊन हा साडी लुक पूर्ण केला आहे. त्याच वेळी, तिने तिचा मेकअप अतिशय हलका ठेवला आहे. तिने कानात मरून रंगाचे स्टड घातले आहेत. या लूकमुळे तु्म्हाला इतरांमध्ये ठळक उठून दिसता येईल.

Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

तुम्ही ही सोनेरी रंगाची जान्हवीसारखी साडी लग्नाच्या फंक्शनमध्येही ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला रॉयल लूक मिळेल. या साडीमध्ये जरीचे वर्क करण्यात आले आहे. यासोबतच जान्हवी कपूरने कानात जड झुमके घातलेत आणि कपाळावर लाल टिकली लावली आहे. जान्हवीचा एकूण लूक लग्नाच्या फंक्शनसाठी परफेक्ट आहे.

- Advertisement -
Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

तुम्ही अशा पांढऱ्या रंगाच्या साडीला मॉडर्न टचसह 2025 साली तुमच्या पार्टी आणि फंक्शनचा एक भाग बनवू शकता. यामुळे तुम्हाला गर्लिश लूक मिळेल. तुम्ही नवीन वर्षात कोणत्याही पार्टीत किंवा लग्नात हा लूक ट्राय करू शकता.

Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

जान्हवी कपूरचा हा ग्लिटर ड्रेस तुम्ही कोणत्याही पार्टीत घालू शकता. यामुळे तुम्हाला आकर्षक लुक मिळेल. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. हा ग्लिटर ड्रेस अगदी युनिक आणि हटके स्टाईलचा आहे.

Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

जान्हवी कपूरच्या मोराच्या ड्रेसची यंदा खूपच चर्चा झाली. या ड्रेसमध्ये संपूर्ण मोराच्या पिसांची नक्षी होती. निळ्या रंगाचा हा ड्रेस तुम्ही लग्नाच्या पार्टीलाही घालू शकता. यावर तुम्ही जान्हवीसारखी हायपोनी स्लीक हेअरस्टाइलही करू शकता.

Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

जान्हवीचा हा लेहेंगा चोली ड्रेसही तुम्ही लग्नाच्या फंक्शन्समध्ये ट्राय करू शकता. हा मल्टिकलर लेहंगा खूप सुंदर दिसत आहे. यामध्ये जान्हवीने केसांना गजरा लावून तिच्या लूकला साऊथ इंडियन टच दिला आहे. जान्हवीचा हा लूक तिच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चेत होता.

Janhvi Kapoor: Janhvi Kapoor's eye-catching looks in 2024
(Image Source : Social Media)

लाल साडीतला जान्हवीचा हा लूकही लोकांना आवडला. हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये जान्हवीने तिच्या कानात सहारा स्टाईल इअर रिंग घातली आहे आणि गळ्यात चोकर व कपाळावर हिरवी बिंदी लावून लूक कम्प्लिट केला आहे.

हेही वाचा : Radhika Apte : राधिका आपटे झाली आई


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -