Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जान्हवीचा लाखमोलाचा ड्रेस

जान्हवीचा लाखमोलाचा ड्रेस

ड्रेसची किंमत एकून व्हाल हैराण!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावरही ती बरीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या हटके फॅशनची सोशल मिडियावर बरीच चर्चा होते. असाच एक हटके ड्रेसमधील जान्हवीचा फोटो सध्य सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या ड्रेसने साऱ्यांचेचं लक्ष वेधले आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने हा ड्रेस परिधान केला होता. एवढा महागडा ड्रेस जान्हवीने ‘रूही’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)


सध्या या लाखमोलाच्या ड्रेसच्या किंमतीवरून जान्हवी सोशल मिडियावर गाजतेयं. जान्हवीने परिधान केलेला स्ट्रॅपलेस सिल्क नियॉन ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर Alexandros Pertsinidis यांनी डिझाइन केलेला आहे. त्याच्या ब्रॅंडचे नाव अॅलेक्स पेरी असे आहे. जान्हवीने परिधान केलेला हा ड्रेस Alexandros Pertsinidisच्या फॉल-विंटर २०२० कलेक्शनमधला आहे. या ड्रेसची किंमत $3,800म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रूपये इतकी आहे. या ड्रेसमधील फोटो जान्हवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “रुही चित्रपटाच्या प्रमोशनचा पहिला दिवस,” अशा आशयाचे कॅप्शन जान्हवीने त्या फोटोला दिले आहे. जान्हवीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या या फोटोला ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.


हेही वाचा- सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज, घरात आला नवा पाहुणा

- Advertisement -

 

- Advertisement -