जान्हवी कपूरचा ‘मिली’ ऑनलाईन झाला लीक; निर्मात्यांचे होणार करोडोंचे नुकसान

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. अशातच निर्मात्यांना या चित्रपटाकडून चांगल्या कलेक्शनची अपेक्षा आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. याचं कारण म्हणजे, जान्हवी कपूरचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही व तासांतच तमिळरॉकर्स आणि टोरेंट सारख्या साइट्सवर लीक करण्यात आला आहे. यामुळे निर्मात्यांना करोडोंचे नुकसान होणार आहे.

‘मिली’ चित्रपटासाठी लावले इतके कोटी
जान्हवी कपूर आणि सनी कौशलचा चित्रपट ‘मिली’ 50 कोटींमध्ये तयार झाला आहे. यातील 20 कोटी चित्रपटाच्या प्रमोशन साठी गेले असून 30 कोटींमध्ये चित्रपटाची निर्मीती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाची कमाई फार कमी झालेली आहे.

जान्हवीच्या ‘मिली’ आणि कतरिनाच्या ‘फोन भूत’मध्ये काटे की टक्कर
4 नोव्हेंबर रोजी जान्हवीचा ‘मिली’ आणि कतरिनाचा ‘फोन भूत’ही प्रदर्शित झाला होता. शिवाय याचं दिवशी सोनाक्षी सिन्हाचा ‘डबल एक्सएल’ देखील प्रदर्शित झाला. अशात चित्रपटाची कमाई होण्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जान्हवीच्या ‘मिली’ चित्रपटाचे दिग्दर्शन मथुकुट्टी जेवियर यांनी केले असून हा चित्रपट मल्याळममधील ‘हेलेन’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी व्यतिरिक्त सनी कौशल आणि मनोज पाहवाभी देखील आहेत.या चित्रपटानंतर जान्हवीचा ‘मिस्टर एंड मिसेज माही’ आणि ‘बवाल’ चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

रणवीर सिंहने यशराज फिल्म्सची सोडसी साथ?