Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंगनाला होणार अटक?, कोर्टात गैरहजर राहिल्याने संतप्त न्यायाधीशांनी दिला अटकेचा इशारा

कंगनाला होणार अटक?, कोर्टात गैरहजर राहिल्याने संतप्त न्यायाधीशांनी दिला अटकेचा इशारा

Related Story

- Advertisement -

गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत(Kangana Ranaut) विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची आज अंधेरी न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान जावेद अख्तर आणि त्याची पत्नी शबाना आझमी न्यायालयात उपस्थित होते. (Javed Akhtar defamation case)  पण अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा सुनावणीदरम्यान न्यायालयात गैरहजर राहील्याने आता कांना पुन्हा एकदा अडचणीत सापडणार असल्याचे दिसतेय. सुनावणी दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने कंगना विरोधात कठोर पाऊल उचलणार असल्याचे व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर, संतप्त न्यायालयाने कंगनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर ती पुढील सुनावणीत न्यायालयात पोहोचली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

कंगना राणौतच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, अभिनेत्रीची प्रकृती खराब असल्यामुळे ती न्यायालयात हजर राहू शकली नाही. त्याचवेळी जावेद अख्तरच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, अनेक नोटिसा देऊनही कंगना येत नाही. त्याचबरोबर याचिकाकर्ते जावेद अख्तर सातत्याने न्यायालयात येत आहेत. या प्रकरणाला जाणीवपूर्वक विलंब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वकीलांनी म्हटले आहे. यासोबतच न्यायालयचा वेळ वाया जात असून न्यायालयाच्या आदेशाचा आदर केला जात नाहीये.
आता या प्रकरणाची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरीकडे, जर कंगना न्यायालयात हजर झाली नाही, तर न्यायालयाच्या मते, तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

- Advertisement -

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात हा खटला अशा वेळी दाखल केला होता जेव्हा कंगनाने गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही मुलाखतींमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीदायक,अपमानास्पद विधाने केली होती. यानंतर जावेदने कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. आणि कंगनाने आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला. तेव्हापासून आजपर्यंत हा खटला न्यायालयात सूरू असून पुढील सुनावणी 20 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.तसेच पुढील सुणावणी दरम्यान कंगना न्यायालयात हजर राहणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – प्रियांकाच्या मेट गाला लूकची नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली,सोशल मीडियावर झाली…

- Advertisement -