जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा

javed akhtar kangana ranaut

अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसून त्या वाढतच आहेत. गेल्या महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या होत्या. आता प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाच्या एका वक्तव्यावरून ही केस दाखल केली आहे. कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जावेद अख्तर यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची धमकी दिली नव्हती.

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, ८ महिन्यांपूर्वी कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेलने ट्विट करून जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप करीत ट्विट द्वारे म्हटले होते की, जावेद अख्तर यांनी घरी बोलवले आणि धमकी दिली की, हृतिक रोशनची माफी माग. महेश भट्ट यांनीही तिच्यावर चप्पल फेकली होती. कारण तिने त्यांच्या सुसाइड बॉम्बर सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. रंगोलीचे हे ट्विट तेव्हा समोर आले होते.त्याच वेळी जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

काय आहे हृतिक कंगनाचा वाद

कंगना हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती, असे बोलले जाते. ब्रेकअपनंतर दोघांचा वाद चांगलाच चर्चेत होता. २०१६ मध्ये एका कार्यक्रमात कंगनाने हृतिकला सिली एक्स असे म्हटले होते. आणि दावा केला होता की, पुरावे म्हणून तिच्याकडे मेल आहेत जे हृतिकने तिला रिलेशनशिपदरम्यान केले होते. यावरून हृतिकने कंगना विरोधात मुंबईतील क्राइम ब्रॅंचमध्ये तक्रार दाखल केली होती. नंतर ही केस निकालाविनाच बंद करण्यात आली होती.