पाकिस्तानबाबत जावेद अख्तर यांनी केलेलं वक्तव्य पाहून कंगना राणावत इम्प्रेस

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक जावेद अख्तरचे कौतुक करत आहेत तर काहींना कंगनाने कौतुक केल्याचं आश्चर्य वाटत आहे.

Kangana-Ranaut-Javed-Akhtar
काही लोक जावेद अख्तरचे कौतुक करत आहेत तर काहींना कंगनाने कौतुक केल्याचं आश्चर्य वाटत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणावत आणि जावेद अख्तर यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता उलटे वारे वाहू लागले आहेत. कारण कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यात असं काही घडलंय की पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खरं तर, जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ शेअर करत कंगना राणावतने त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या व्हिडीओसोबत तिची कॅप्शनही प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

या व्हिडीओमध्ये गीतकार जावेद अख्तर हे मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना दिसत आहेतय हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानी होते हे भारतीयांनी विसरू नये, असं ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसून येत आहेत. जावेद म्हणाले की, “हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तचे नव्हते. ते अजूनही आपल्या देशात आहेत, त्यामुळे एखाद्या भारतीयाने याबाबत तक्रार केल्यास तुम्ही नाराज होऊ नका.” याशिवाय जावेद अख्तर यांनीही पाकिस्तानबाबत वक्तव्य केले होते.

जावेद अख्तर यांच्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत कंगना रणावत म्हणाली की, जेव्हा मी जावेद साहेबांची कविता ऐकायचे तेव्हा मला वाटायचं की सरस्वतीजींनी त्यांच्यावर इतका आशीर्वादाचा वर्षाव कसा केला, पण बघा, माणसात काही तरी असतं, म्हणूनच त्यांच्यामध्ये खणखणीतपणा असतो. जय हिंद. घरात घुसून मारले.. हा हा.”

यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक जावेद अख्तरचे कौतुक करत आहेत तर काहींना कंगनाने कौतुक केल्याचं आश्चर्य वाटत आहे. कंगना राणौत सध्या इमरजेंसी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे.