घरमनोरंजनतो एक सज्जन व्यक्ती... शाहरुखवर टीका करणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

तो एक सज्जन व्यक्ती… शाहरुखवर टीका करणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’बुधवारी (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध केला जात होता. परंतु आता पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज देखील चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध लेखक, गीतकार आणि कवि जावेद अख्तर यांनी देखील शाहरुखचं कौतुक करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

शाहरुखवर टीका करणाऱ्यांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर
जावेद अख्तर कोलकत्तामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका साहित्यिक बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बॉयकॉट बॉलिवूबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं, त्यावेळी ते म्हणाले की, “बॉयकॉट ट्रेंडची चिंता करण्याची गरज नाही. लोक शाहरुखबाबत जे काही सांगत आहेत ते सगळं भोगस आहे. तो एक सज्जन व्यक्ती आहे. तो धर्मनिरपेक्ष आहे. त्याच्यापेक्षा धर्मनिरपेक्ष कोणीही नाही. मी ही गोष्ट इतक्या छातीठोकपणे सांगू शकतो कारण, मी त्याच्या घरातील वातावरण पाहिलं आहे. मला ठाऊक आहे तो त्याच्या घरामध्ये कसा राहतो.”

- Advertisement -

देशभरातील प्रेक्षकांना ‘पठाण’ची भुरळ

अनेकांना पठाण चित्रपटाची भुरळ पडली आहे. पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरत आहे. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

काश्मिरमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ने तोडला 32 वर्षांचा रेकॉर्ड; चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -