Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Jawan Movie Review : शाहरुख खानच्या स्टारडमवर 'जवान'चा डोलारा

Jawan Movie Review : शाहरुख खानच्या स्टारडमवर ‘जवान’चा डोलारा

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

आपल्याकडे नेहमीच अशी चर्चा चालते की, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता आणि दक्षिणेतील दिग्दर्शक या दोघांनी मिळून चित्रपट करायला पाहिजे. असा चित्रपट नक्कीच यशस्वी होणार, कारण चित्रपटाच्या व्यावसायिक गणितामध्ये दक्षिणात्य दिग्दर्शक पुढे आहेत. इतकेच नव्हे तर, जुन्या कथानकाला नवीन रुपडे देण्यातही त्यांचा हात कोणी धरणार नाही. शाहरुख खानची कंपनी रेड चिली आणि Atlee या दोघांनी मिळून जवान हा चित्रपट तयार केला आहे. अभिनेत्री म्हणून नयनतारा आणि खलनायक म्हणून विजय सेतुपती यांसह दक्षिणेतील अनेक कलाकार तसेच तंत्रज्ञ हे दक्षिणात्य असून जवानमध्ये हे सगळं एकत्रित दिसून येते.

- Advertisement -

आपल्याकडे नेहमी बोललं जातं, उद्योगपतींना करोडो रुपयांचे कर्ज स्वस्तात दिलं जातं. मात्र तेच शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर, त्याच्या व्याजाच्या दरामध्ये बऱ्यापैकी वाढ असते आणि उद्योगपतीने जर का ते कर्ज नाही चुकवलं, तर त्यांचं कर्ज सरकार माफ करते. परंतु शेतकऱ्याला मात्र त्रास दिला जातो, त्या त्रासात तो शेतकरी आत्महत्या देखील करून बसतो. आरोग्य मंत्री आजारी पडला तर तो त्याच्यावर उपचार सरकारी रुग्णालयांमधून करत नाहीत. तर तो प्रायव्हेट रुग्णालयात जातो. त्यामुळे गरिबांना औषधसामुग्री मिळते की नाही याची त्याला परवा नसते. या आणि अशा अनेक मुद्द्यांसोबत जवानचे कथानक फिरते.

जवानचे कथानक तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. परंतु Atlee आणि रमन गिरी वासन यांनी या पाहिलेला कथानकाला परत लिहिले आहे. अश्याप्रकरे की पाहताना अजिबात कंटाळा येत नाही. पटकथेमध्ये रोमान्स, इमोशन, बदला आणि ॲक्शन या चार मुद्द्यांना अशाप्रकारे गुंतले की, तीन तास असलेला हा चित्रपट अजिबात डोईजड होत नाही. एका नंतर एक असे दृश्य येतात की, पाहताना खिळून राहायला होते.

- Advertisement -

पोलीस ऑफिसर आजाद (शाहरुख खान) हा समाजात असलेल्या भ्रष्टाचारापासून वैतागलेला असतो. गरीब आणि पिडीत लोकांना अजिबात न्याय मिळत नाही, असे त्याचे म्हणणे असते. या लोकांना न्याय देण्यासाठी म्हणून तो रॉबिनहूड स्टाईलने काम करू लागतो आणि रॉबिनहूडप्रमाणेच सामान्य लोकांमध्ये प्रसिद्धी पावतो. आझादला मदत करणारी त्याची छोटी गॅंग आहे, जी आधुनिक तंत्रज्ञानाने वापर करून लढा देते.

आझाद, विक्रम राठोडचे नाव घेऊन (वेश बदलून, शाहरुखने या चित्रपटासाठी सहा वेश बदलले आहेत) काम करू लागतो. त्याला पकडण्याचे काम इन्स्पेक्टर नर्मदा (नयनतारा) याच्यावर सोपवले जाते. दरम्यान विक्रम राठोड आणि शस्त्र व्यावसायिक काली गायकवाड (विजय सेतुपती) यांचा काय संबंध आहे? चित्रपट जसा पुढे सरकू लागतो, तसतसं नर्मदा, काली आणि इतर व्यक्तिरेखांचा विक्रम राठोड तसेच आझाद बरोबर असलेला संबंध स्पष्ट होत जातो.

दिग्दर्शक Atlee यांनी जवान या चित्रपटाला फुल स्पीडमध्ये पळवले आहे. कोठेही हा चित्रपट, कोणत्याही मुद्द्यावर रेंगाळत नाही. Atlee सस्पेन्सवरचा पडदा देखील लवकरच उठवतात आणि एका मागोमाग एक प्रसंग समोर येतात. जवान पाहताना तुम्हाला ‘गब्बर इज बॅक’ यासह अनेक चित्रपटांची आठवण येत राहते. 1980 च्या आसपास जेव्हा अमिताभ बच्चन आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होते. तेव्हा त्यांच्या चित्रपटांमध्ये देखील अशाच प्रकारचे कथानक पाहायला मिळत होते. दिग्दर्शक Atlee यांचे दिग्दर्शन ‘जवान’ या चित्रपटाला ट्रीटमेंट आणि एक्झिक्युशनद्वारे एक वेगळाच दर्जा प्राप्त करून देतात.

शेतकऱ्याची आत्महत्या हा प्रसंग भावुक करतो. आरोग्यमंत्र्याचे आजारपण या प्रसंगामध्ये राग आणि हसू दोन्ही देतात. आझाद आणि नर्मदाच्या प्रेम कहाणीमध्ये नर्मदाच्या मुलीचा अतिशय उत्तम वापर करून घेण्यात आला आहे. मध्यंतरी पुर्व विक्रम राठोडची एन्ट्री रोमांचित करते. तिकडे विक्रमचा ॲक्शन सिक्वेन्स हा सगळ्या ॲक्शन सिक्वेन्सचा बाप मानायला पाहिजे. विक्रमसाठी वापरलेले गेलेले पार्श्वसंगीत तसेच त्याचा एकंदरीत हावभाव भावून जातो.

तरुण मुली आणि महिलांमध्ये शाहरुख खान खूप प्रसिद्ध आहे. या गोष्टीचा फायदा दिग्दर्शक Atlee याने शाहरुख खानची गॅंग तसेच त्याला महिला कैद्यांचा जेलर बनवून, एक प्रकारे फायदा उचलल्याचे पाहायला मिळते. शाहरुख खानचा एक लक्षवेधी सिन आहे. त्यामध्ये आपण साधे पेन घेताना दुकानदाराला अनेक प्रश्न विचारतो. त्यानंतर ते पेन कसे चालते ते पाहण्यासाठी अनेकदा रेघोट्या काढतो. मग आपण मतदान करताना आपल्या उमेदवाराला का नाही विचारत की, तू आमच्यासाठी काय करणार आहे किंवा काय करू शकतो? त्यानंतरच त्याला मतदान करावे. हे दृश्य परिणामकारक वठले आहे.

दिग्दर्शक म्हणून Atlee इतके प्रभावित करतात की, प्रेक्षकांना विचार करायची ते संधी देत नाहीत. जलदगतीने आपले म्हणणे मांडून परत पुढच्या दृश्याकडे ते प्रेक्षकांना हात धरून घेऊन जाण्याचे काम खुबीने करतात. सामान्य दृश्यांना पण ते लार्जेर देन लाईफचा आकार देऊन गुंतवून ठेवतात. ‘जवान’मधील सगळीच दृश्य मनोरंजक झाली आहेत. दिग्दर्शकाने ही दृश्य रंगवताना अनेकदा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे, ते सुद्धा आपण विसरून जातो.

दक्षिणात्य दिग्दर्शक हे मसाला चित्रपट बनवण्यामध्ये का पुढे आहेत ते Atleeच काम पाहून लगेच लक्षात येते. जेथे गरज आहे तिथे भावनिक दृश्य पेरून, गाण्यांची पेरणी देखील यथायोग्य केल्याचे दिसून येते. ‘जवान’ हा चित्रपट ॲक्शनपट आहे. त्यात मास मोमेंट्स तयार करण्यात देखील ॲटली कमी पडत नाहीत. उत्तरार्धानंतर काही प्रमाणात फिल्म कंटाळवाणी होऊ लागते, मात्र चित्रपट पुन्हा जोर पकडतो. ‘जवान’चे अनेक संवाद हे, हमखास टाळ्या घेणारे आहेत.

‘जवान’ हा सगळा चित्रपट शाहरुख खानचा आहे. त्यात तो फुल फॉर्ममध्ये दिसून येतो. या चित्रपटामध्ये शाहरुख, तब्बल सहा रूपात पाहायला मिळतो. तर प्रत्येक भूमिकेमध्ये त्याचे संवाद, हावभाव आणि लुक हे वेगळ्या प्रकारचे दिसून येते. शाहरुख खानच्या स्टारडमचा येथे पुरेपूर वापर करताना ॲटली दिसतो. तसेच शाहरुख खानची पर्सनॅलिटी, त्याची लकब याचा देखील त्याने येथे अतिशय उत्तम वापर केलेला पाहायला मिळतो. चित्रपट फक्त शाहरुख खान आणि फक्त शाहरुख खानचाच म्हणून लक्षात राहतो.

दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्यात ती अतिशय सुंदर दिसते. इतकेच नव्हे तर तिची शाहरुख खान बरोबरील केमिस्ट्री देखील लाजवाब आहे. नर्मदा म्हणून, नयनतारा भावून जाते. ॲक्शन करताना तिची चपळाई अचंभीत करते. खलनायक म्हणून विजय सेतूपती लक्षात राहतो. अभिनयाच्या जोरावर, काली म्हणून विजय आपल्याला वेगळेपणा देतो. जवानमध्ये त्याची संवादफेकी खासच आहे. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत संजय दत्त आणि दीपिका पडुकोण चित्रपटाचा एकंदरीत दर्जा वाढवताना दिसतात. प्रियमनी, सानिया मल्होत्रा, सुनील ग्रोवर यांनी छोटेखानी भूमिकेत देखील आपला शिक्का जमवलाय.

अनिरुद्ध यांनी संगीतबद्ध केलेलं ‘रमय्या वस्तावया…’ हे एकच गाणं लक्षात राहतं. बाकी गाणी साधारण आहेत. पार्श्वसंगीत उत्तम आहे. संकलन आणि सिनेमॅटोग्राफी चित्रपटाची खास जमा बाजू ठरतात. जवानची प्रोडक्शन व्हॅल्यू उत्तम आहेत. टेक्निकल डिपार्टमेंट मध्येसुद्धा ‘जवान’ सर्वोत्तम ठरतो.

पॅन इंडिया आणि मासी या दोन शब्दांसोबत, चप्पखल बसणारा सिनेमा म्हणजे जवान. हिंदीसह हा चित्रपट तमिळ, तेलुगू मध्ये सुध्दा प्रदर्शित होत आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी येथे मनोरंजक मूल्य आहेत सोबत सामाजिक बोध देखील आहे. एकंदरीत, सगळ्यांसाठी सगळे असलेला ‘जवान’ एकदा पहायला हरकत नाही.

- Advertisment -