शाहरुख खान याचा जवान सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. या सिनेमाने जगभरात 800 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक एटली यांचा हा अॅक्शन सिनेमा सुपरहिट ठरला आहे. किंग खानसह सिनेमात तीन नवे चेहरे सुद्धा दिसून आले आहेत. ते म्हणजे आलिया कुरैशी, लहर खान आणि संजीता भट्टाचार्य. त्यांनी प्रियामणि, सान्या मल्होत्रा, गिरिजा ओक सोबत मिळून शाहरुखच्या या सिनेमात धमाल केली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत आलियाने जवानच्या सेटवरील एक किस्सा शेअर केला. आलिया जिंदा बंदा या गाण्यातील काही सिनमध्ये झळकलीच नाही. याचे कारण सांगत ती म्हणाली की, डांन्स शूट दरम्यान माझ्यासोबत एक लहान अपघात झाला होता. तो मजेशीर वाटेल. पण आम्ही जेव्हा रिहर्सल करत होतो तेव्हा डांन्सरची डफली त्याच्या हातातून निसटून माझ्या डोक्यावर पडली. तेव्हा एटली सरांनी डोक्याला लागल्यामुळे घरी जाऊन आराम करण्यास सांगितले होते.
आलियाने पुढे असे म्हटले की, तिला दोन दिवस चालता सुद्धा येत नव्हते. तिच्या डोक्यात खुप दुखत होते. तिने पेनकिलर औषधं सुद्धा घेतली. त्यानंतर जिंदा बंदा मध्ये शाहरूख सोबत डान्स करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली. शाहरूख सोबत डान्स करण्याची संधी वारंवार मिळत नाही असे ही म्हटले.
सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास तर शाहरूखच्या विरोधात नयनतारा झळकली आहे. विजय सेतुपति निगेटिव्ह रोलमध्ये दिसून आला आहे. सिनेमात दीपिका पादुकोण आणि संजय दत्त कॅमिओ रोलमध्ये आहेत. एटलीने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे आणि गौरी खान प्रोड्यूसर आहे. हा शाहरूखचे प्रोडक्शन हाउस रेड चिलीज एंटरटेनमेंटचा सिनेमा आहे.
हेही वाचा- शाहरूख खानचा जबरा फॅन; चित्रपटगृहात व्हेंटिलेटर नेत पाहिला जवान चित्रपट…