घर मनोरंजन जवानने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत गाठला 350 कोटींचा टप्पा

जवानने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत गाठला 350 कोटींचा टप्पा

Subscribe

यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यात आलेला पठान सिनेमातून शाहरूख खानने चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एन्ट्री केली होती. आपल्या स्पाय अवतारमध्ये शाहरूखने बॉलिवूड इंडस्ट्रीला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा दिला. आता आठ महिन्यानंतर शाहरूखचा नवा सिनेमा ‘जवान’ थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची उत्तम साथ मिळत आहे.

जवान सिनेमा ऐवढा हाऊसफुल्ल सुरु आहे की, त्याचे तिकिट मिळणे ही मुश्किल झाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक मोठा ओपनिंगचा सिनेमा म्हणून आता बोलले जात आहे. ट्रेड रिपोर्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास तर जवानचे नेट कलेक्शन 73-75 कोटींच्या रेंजमध्ये आहे. म्हणजेच केवळ तीन दिवसांत शाहरूखच्या सिनेमाने भारतात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. शनिवार नंतर जवानचे नेट कलेक्शन 201 कोटींपेक्षा अधिक आहे.

- Advertisement -

जवान सिनेमाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 240 कोटींपेक्षा अधिक झाले. मात्र तिसऱ्या दिवशी भारतात सिनेमाने 90 कोटींचा जवळ कमावले. तर ओवरसीज मार्केटमध्ये सिनेमाने शनिवारी उत्तम कमाई केली. फाइनर आकडेवारीनुसार जवानने तिसऱ्या दिवशी वर्ल्डवाइड कलेक्शन 125 कोटींपेक्षा अधिक दिसून येतो. म्हणजेच शाहरूखच्या सिनेमाने तीन दिवसात वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 350 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे.

सिनेमा प्रत्येक दिवशी कमाईचे सर्व टॉप रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. रविवारसाठी सिनेमाची अॅडवान्स बुकिंग शुक्रवार ऐवढीच तगडी आहे आणि थिएटर्समध्ये सुद्धा प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे. चौथ्या दिवशी जवान सिनेमा आपला ओपनिंग रेकॉर्ड मोडू शकतो असा अंदाज लावला जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा- Jawan : OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार जवान, कुठे आणि केव्हा पाहू शकणार SRK फॅन्स

- Advertisment -