घरमनोरंजन'जवान' सिनेमाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 900 कोटींच्या पार

‘जवान’ सिनेमाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 900 कोटींच्या पार

Subscribe

बॉक्स ऑफिसवर सध्या शाहरूख खान याचा सिनेमा जवान बक्कळ कमाई करत आहे. जवान यंदाच्या वर्षातील हाइएस्ट ओपनर सिनेमा ठरला आहे. ऐवढेच नव्हे तर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. भारतासह परदेशात ही शाहरूख खान आणि नयनतारा कास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे.

जवान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. जर्मनीत या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. मलेशिया, अमेरिका आणि अन्य ठिकाणी सुद्धा याचे कलेक्शन बक्कळ झाले आहे. सिनेमाने आधीच 900 कोटींचा टप्पा पार केला होता. आता 950 कोटींच्या ही पार गेला आहे.

- Advertisement -

गेल्या 17 दिवसात एटली कुमार दिग्दर्शित या सिनेमाने जगभरात 953.97 कोटींपर्यंत कमाई केली आहे. किंग खान याची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून याच्या कलेक्शनची आकडेवारी दिली गेली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत या सिनेमांनी केलीयं 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई
दंगल- 2051 कोटी
बाहुबली 2- 1814 कोटी
आरआरआर- 1288 कोटी
केजीएफ: चॅप्टर 2- 1208 कोटी
पठान- 1050.8 कोटी

सिनेमाला मिळत असलेल्या यशासंबंधित एका मुलाखतीत एटली कुमार यांनी म्हटले होते की, जवान सिनेमाला ऑस्करसाठी पाठवू इच्छितो. यासंदर्भात ते शाहरूख खानशी बोलणार आहेत.


हेही वाचा- Movie Review : मानवतेची शिकवण देणारा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -