Jawan : शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

अलीकडेच रेड चिलीज एंटरटेनमेंटने मेगास्टार शाहरुख खान अभिनीत ‘जवान’ या मोठ्या ऍक्शन एंटरटेवर चित्रपटाची घोषणा केली आहे. ऍटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट एक नेत्रदीपक चित्रपट असल्याचे वचन देतो जो उच्च ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्ससह भारतीय चित्रपटाची प्रतिभा प्रदर्शित करेल. ऍटली यांनी दक्षिणेत अनेक यशस्वी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यामध्ये राजा राणी, थेरी, मेर्सल आणि बिगिल यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता एटली बहुप्रतिक्षित जवान या चित्रपटातून आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाबाबत अनेक अटकळी बांधल्या जात होत्या मात्र आता या सर्व अटकळांना पूर्णविराम देत या चित्रपटाची घोषणा एका टीझर व्हिडिओ युनिटसह करण्यात आली आहे, ज्यात शाहरुख खानला रफ बॅकग्राउंडवर, जखमी आणि मलमपट्टी केलेला असे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक आगामी काळासाठी टोन सेट करणारा असून हा लार्जर दॅन लाइफ अॅक्शन एंटरटेनर चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये 2 जून 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, “जवान ही एक सार्वत्रिक कथा आहे जी भाषा, भौगोलिकतेच्या पलीकडे आहे आणि सर्वांच्या आनंदासाठी आहे. हा अनोखा चित्रपट बनवण्याचे श्रेय एटली यांना जाते, माझ्यासाठी देखील हा शानदार अनुभव होता. कारण मला अॅक्शन चित्रपट आवडतात. टीझर ही फक्त एक सुरुवात आहे आणि पुढे काय होणार आहे याची झलक देतो.”

जवान रेड चिलीज एंटरटेनमेंट सादर करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असून गौरी खान निर्मित आहे. जवान 2 जून 2023 ला पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा शाहरुख खानचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेसह, शाहरुख खान पुढील वर्षी डंकी, पठाण आणि आता जवान या तीन चित्रपटांसह प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.


हेही वाचा :http://Vikram : ‘विक्रम’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली ॲडव्हान्स बुकिंगद्वारे इतक्या कोटींची कमाई