Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'जवानी २०' च्या निमित्ताने रेश्मा सोनावणे, हरिदास कड पुन्हा एकत्र !

‘जवानी २०’ च्या निमित्ताने रेश्मा सोनावणे, हरिदास कड पुन्हा एकत्र !

Related Story

- Advertisement -

‘पप्पी दे पारूला’ हे सुपरहिट गाणे देणाऱ्या गायिका रेश्मा सोनावणे आणि गीतकार हरिदास कड आता नवीन धमाकेदार गाणे घेऊन आले आहेत. ‘मला न्हाय रं कुणाची गॅरंटी, माझी हाय रं जवानी २०’ हे गाणे सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे. सप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आउल स्टुडिओज प्रस्तुत “जवानी २०….”या गाण्याची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. नीलेश माळी आणि संदीप हिंदळेकर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. अनुजा चौधरी आणि प्रियांका जाधव म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन, अनिकेत के. यांनी छाया दिग्दर्शन केलं आहे.

- Advertisement -

रेश्मा सोनावणे यांनी आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांतील सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यात “पप्पी दे पारुला”, “ही पोळी साजूक तुपातली”, “वाट बघतोय रिक्षावाला” अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. तर गीतकार हरिदास कड यांनीही “लय भारी पोरी”, “पप्पी दे पारूला” अशा गाण्यांचं लेखन केलं आहे. त्यामुळे गायिका आणि गीतकार म्हणून रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांची जोडी आधीपासूनच हिट आहे.

‘सप्तसूर म्युझिक’ या युट्यूब चॅनलनं आतापर्यंत अनेक नव्या दमाच्या गीतकार, संगीतकार, गायकांना संधी दिली आहे. अनेक कलाकारांना मोठं करणारे म्युझिक व्हिडिओ अलीकडे दुर्मीळ झालेले असताना सप्तसूर म्युझिकनं गेल्या काही महिन्यांत अनेक नवे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत. त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही लाभला आहे. त्यामुळे रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांचं “जवानी २०” हे नवं धमाकेदार गाणंही नक्कीच प्रेक्षक डोक्यावर घेतील यात शंका नाही.


- Advertisement -

 

- Advertisement -