ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणारा ‘जय भीम’ ठरला पहिला भारतीय सिनेमा

‘जय भीम’ हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे. साऊथ सुपरस्टार सूर्याची सिनेमात मुख्य भूमीका आहे. सिनेमाची कथा,विषय आणि कलाकारांनी सादर केलेल्या त्यांच्या कसदार अभिनयामुळे प्रेक्षकांसह समीक्षकांच्या कौतुकाची थाप सिनेमाला मिळाली. इतकंच काय तर जय भीम हा सिनेमा ऑस्करच्या यूट्यूबवर झळकणार आहे.