घरमनोरंजनजया - अमिताभ यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण, बिग बींनी शेअर केला...

जया – अमिताभ यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण, बिग बींनी शेअर केला फोटो

Subscribe

जया बच्चन कॉलेजच्या दिवसापासून अमिताभ बच्चन यांना पसंत करत असे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

बॉलिवूड मधील दिगज्ज अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच ठाऊक आहे. आज दोघांच्याही लग्नाचा 48 वा वाढदिवस आहे. आणि या खास दिवसाचे अवचित्त साधून महानायक अमिताभ बच्चनयांनी सोशल मीडिया अकाऊंट वर त्यांच्या लग्नातीत काही खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. अनेकांनी बिग बींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहलं आहे की,”3 जून 1973.. लग्नाच्या वाढदिवशी ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात,त्यांचे खूप आभार मानतो” अमिताभ बच्चन यांनी इंस्टापोस्टद्वारे आभार प्रकट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

माहितीनुसार जया बच्चन कॉलेजच्या दिवसापासून अमिताभ बच्चन यांना पसंत करत असे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 1972 साली रिलीज झालेला चित्रपट ‘बंसी बिरजू’ मध्ये दोघेही पहिल्यांदा एकत्र झळकले होते. जंजीर,शोले,चुपके चुपके,अभिमान सारख्या हिट चित्रपटात दोघांनी काम केलं आहे. अमिताभ बच्चन आपल्या सिनेमाच्या शूटिंग करिता पुण्यात गेले होते. आणि त्यादरम्यान जया बच्चन तिथे शिकण्याकरिता गेली होती. पहिल्या नजरेतच जया यांना अमिताभ बच्चन आवडू लागले . दोघांची पहिली भेट ‘गुड्डी’ सिनेमाच्या सेट वर झाली. या सिनेमात आधी बिग बी यांना साईन केलं होतं नंतर काही करणास्तव त्यांना रीप्लेस करण्यात आले.

‘जंजीर’ सिनेमात पहिल्यांदा एकत्र झळकल्यानंतर दोघांमध्येही हळू-हळू प्रेम फुलू लागले होते. असे बोलण्यात येते की जया बच्चन आणि बिग बी दोघांचाही परदेशात सुट्टी एंजॉय करण्याचा प्लान केला होता. पण अबीतभ बच्चन यांच्या वडिलांनी म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांनी स्पष्ट नकार दिला त्यांनी अमिताभ यांना ताकीद देत म्हणाले आधी तुम्हाला लग्न करावे लागेल,तेव्हाच तुम्ही एकत्र जाऊ शकतात. यानंतर त्यांनी अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली.

- Advertisement -

हे हि वाचा – रनिंगसाठी ‘या’ टिप्स फॉलो करतो मिलिंद सोमण, काय आहे फिटनेस फंडा ?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -